Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीमुळे महागाई दर नियंत्रणात

जीएसटीमुळे महागाई दर नियंत्रणात

जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्यानंतर महागाई दर सहा टक्क्यांपेक्षा अधिक होऊ देणार नाही, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी व्यक्त केले

By admin | Published: August 22, 2016 05:15 AM2016-08-22T05:15:01+5:302016-08-22T05:15:01+5:30

जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्यानंतर महागाई दर सहा टक्क्यांपेक्षा अधिक होऊ देणार नाही, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी व्यक्त केले

GST to control inflation rates | जीएसटीमुळे महागाई दर नियंत्रणात

जीएसटीमुळे महागाई दर नियंत्रणात


जयपूर : जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्यानंतर महागाई दर सहा टक्क्यांपेक्षा अधिक होऊ देणार नाही, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी व्यक्त केले. दरम्यान, १ एप्रिलपासून देशभरात जीएसटी लागू केला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जीएसटी लागू झाल्यानंतर महागाई दर नियंत्रणात ठेवण्याची पूर्ण काळजी घेण्यात येईल. यासाठी आरबीआयसोबत बैठक घेण्यात येईल. हा दर ६ टक्क्यांपेक्षा अधिक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील. जीएसटी ग्राहकांच्या हिताचे आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. जीएसटीमुळे एकूणच अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि त्याचा थेट ग्राहकांना लाभ होईल, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
>गुजरात, छत्तीसगढमध्ये आज विशेष अधिवेशन
जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी सोमवारी गुजरात आणि छत्तीसगढ या दोन भाजपाशासित राज्यांमध्ये विधानसभांचे खास अधिवेशन बोलविले आहे. भाजपाशासित आसाममध्ये १२ आॅगस्ट रोजी हे विधेयक मंजूर झाले आहे.भाजपाचा प्रयत्न... देशभरात जीएसटी १ एप्रिलपासून लागू करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न चालविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाशासित राज्यात हे विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न होत आहे.
>विशेष आधिवेशन
जीएसटीवरून काही संभ्रम अद्यापही कायम असला, तरी व्यापाऱ्यांसोबत देशभरात बैठका घेऊन या शंका दूर करण्यात येतील. जीएसटीत राज्यांचा हिस्सा किती असावा, ते लवकरच ठरविले जाईल. महाराष्ट्रासह काही राज्यांत त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे.
> उद्योग संघटनांशी बैठक
जीएसटी लागू करण्यासाठी हालचालींनी वेग घेतला असून, राज्यांचे अर्थमंत्री आता ३० आॅगस्ट रोजी उद्योगातील संघटनांशी चर्चा करणार आहेत.
या संघटनांनी जीएसटीबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत, या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी उद्योगातील संघटना सीआयआय, फिक्की व असोचेमसह अन्य संघटनांशी चर्चा करतील.

Web Title: GST to control inflation rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.