Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑनलाईन गेमींग महागणार! २८ टक्के जीएसटी लागणार, कॅन्सरच्या औषधांना मिळणार सुट

ऑनलाईन गेमींग महागणार! २८ टक्के जीएसटी लागणार, कॅन्सरच्या औषधांना मिळणार सुट

नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५० व्या GST परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 07:58 PM2023-07-11T19:58:26+5:302023-07-11T19:59:06+5:30

नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५० व्या GST परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

gst council 50 meeting decisions 28 percent gst will be levied on full value of gaming horse racing check all details | ऑनलाईन गेमींग महागणार! २८ टक्के जीएसटी लागणार, कॅन्सरच्या औषधांना मिळणार सुट

ऑनलाईन गेमींग महागणार! २८ टक्के जीएसटी लागणार, कॅन्सरच्या औषधांना मिळणार सुट

नवी दिल्लीत आज जीएसटीची ५० वी बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ऑनलाइन गेमिंगची कर आकारणी, युटिलिटी वाहनांची व्याख्या, इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) नोंदणी आणि दावा करण्याचे नियम, सिनेमा हॉलमध्ये दिल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांच्या आयातीवर सूट आणि कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या औषधांचा समावेश होता.

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्करोगावरील औषधांना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. जीएसटी कौन्सिलमधील पश्चिम बंगालच्या प्रतिनिधीने ही माहिती दिली. परदेशातून वैयक्तिक वापरासाठी कर्करोगाची औषधे कोणी विकत घेतल्यास त्यावरही जीएसटी आकारला जाणार नाही. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये दोन सदस्यीय जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाच्या निर्मितीवरही परिषदेच्या बैठकीत एक करार झाला आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले मिळाले, तटकरे अद्याप प्रतिक्षेत; मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त समजला

याशिवाय सिनेमागृहातील खाण्यापिण्याच्या वस्तूंवर जीएसटी कपातीची घोषणा करण्यात आली आहे. जीएसटी कौन्सिलने कॅन्सरच्या आयातीच्या औषधांवर IGST न लावण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जीएसटी न्यायाधिकरणाच्या स्थापनेला परिषदेने मान्यता दिली आहे. 

Web Title: gst council 50 meeting decisions 28 percent gst will be levied on full value of gaming horse racing check all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.