नवी दिल्ली - दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या या आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील कराचा दर घटवण्यावर विचार होण्याची शक्यता आहे. या बैठकीत हाताने बनवण्यात आलेले फर्निचर, प्लॅस्टिकची उत्पादने आणि शाम्पूसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटीच्या दरात घट करण्याबाबत चर्चा होईल. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलची बैठक 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
याबाबत सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दैनंदिन वापरातील वस्तूंवरील 28 टक्के जीएसटीचा दर कमी करण्यावर विचार करण्यात येणार आहे. तसेच जीएसटी लागू झाल्यानंतर कराचे दर वाढलेल्या लघू आणि मध्यम उद्योगांना दिलासा देण्यासाठी समिती त्या क्षेत्रातील करांचे दर सुसंगत करण्यासाठी काम करेल. याआधीच्या करप्रणालीमध्ये या उद्योगांवर उत्पादव शुल्काच्या दराची सूट होती. तसेच यांच्यावर किमान दराने मुल्यवर्धीत कर (व्हॅट) लावण्यात येत असे.
या वर्षी 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली होती. तेव्हापासून जीएसटी परिषदेची बैठक दर महिन्याला होत आहे. तसेच या बैठकीमध्ये जीएसटीत कंपन्यांबरोबरच ग्राहकानांही दिलासा मिळेल असे, अनेक बदल करण्यात आले आहेत.
तसेच एका अधिकाऱ्याने सांगितले की, 28 टक्के स्लॅब रेटवाल्या वस्तूंवरील टॅक्स रेट सुसंगत केले जातील. दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटीचा दर घटवून 18 टक्के करण्यात येणार आहे.
जीएसटी कौन्सिल दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील टॅक्स घटवण्याच्या विचारात
दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या या आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील कराचा दर घटवण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 04:52 PM2017-11-05T16:52:46+5:302017-11-05T16:53:07+5:30