GST Council meeting latest news: वस्तू आणि सेवा कर परिषदेची (GST Council) आज नवी दिल्लीत ४४ वी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यात म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधं टॅक्स फ्री करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय कोरोना संबंधीच्या उपकरणांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. (GST Council Meet Drugs on Black Fungus Tax Free 5 percent GST on corona vaccine)
GST Council has approved a reduction in rate for Remdesivir from 12% to 5%. No tax on Tocilizumab, Amphotericin B medicines. GST rates on the specified items being used in COVID19 relief and management till 30th September 2021 pic.twitter.com/uP8DPqrooI
— ANI (@ANI) June 12, 2021
दरम्यान, कोरोना लसीवर ५ टक्के जीएसटी यापुढेही कायम राहणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. आज बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अधिसुचना उद्या जारी केली जाईल असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच जीएसटीचं आज जारी करण्यात आलेले दर ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत.
GST on electric furnaces and temperature checking equipment brought down to 5% and on ambulances to 12%. These rates will be valid till September as against August end recommended by the GoM: Finance Minister Nirmala Sitharaman on the outcome of 44th GST Council meet pic.twitter.com/ZxdV0k7wVL
— ANI (@ANI) June 12, 2021
कोरोना लसीवर GST कायम
कोरोना लसीवरील जीएसटी माफ करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. पण जीएसटी परिषदेनं लसीवरील जीएसटी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीवर ५ टक्के जीएसटी लागू राहणार आहे.
GST Council agrees to stick to 5% tax rate on vaccines: Finance Minister Nirmala Sitharaman
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2021
रेमडेसिवीरही होणार स्वस्त
कोरोना रुग्णावर उपचारासाठी महत्वाचं ठरत असलेल्या रेमडेसिवीरवरील जीएसटीमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटी आता ५ टक्के इतका करण्यात आला आहे. याआधी रेमडेसिवीरवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.