मुंबई : देशाच्या जीडीपीत ७ टक्के वाटा असलेल्या दागिन्यांच्या क्षेत्राला वर्षभरात जीएसटीमुळे फटका बसला. आधी १ टक्का असलेल्या उत्पादन शुल्काची जागा आता ३ टक्के दराच्या जीएसटीने घेतली आहे. यामुळे दागिन्यांची निर्यात जवळपास १५ टक्के घटली.१ जुलै २०१७ला लागू झालेल्या जीएसटीला ३० जूनला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने वाणिज्य मंत्रालयाखालील जेम्स अॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) निर्यातीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार उत्पादन शुल्कापेक्षा जीएसटीचा दर अधिक असल्याने निर्यातीवर परिणाम झाल्याचे मत कौन्सिलने नोंदवले आहे. कौन्सिलचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सांगितले की, ज्वेलरी उद्योगाचा देशाच्या निर्यातीत १५ टक्के वाटा आहे. पॉलिश केलेल्या हिऱ्याच्या दागिन्यांचा सर्वांत मोठा निर्यातक भारत आहे. या दागिन्यांवरही आधी ३ टक्के जीएसटी होता. त्याचा निर्यातीला मोठा फटका बसला होता. कौन्सिलच्या मागणीनंतर हा दर ०.२५ टक्क्यांवर करण्यात आला. त्यानंतर निर्यातीत ७.३९ टक्क्यांची मोठी वाढ झाली. पण तयार दागिन्यांवरील ३ टक्के जीएसटी अद्यापही चिंतेचा विषय आहे. हा दर उत्पादन शुल्कापेक्षा अधिक असल्याने तो कमी करण्याची गरज आहे.पॉलिश केलेल्या हिºयांच्या दागिन्यांवर जीएसटी अधिक असताना जुलै २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान निर्यातीत फक्त ०.१७ टक्के वाढ झाली. जीएसटी कौन्सिलने त्यानंतर दर कमी केल्यावर चार महिन्यांतच मे अखेरीस निर्यात ७.३९ टक्के वाढल्याचे दिसून आले.निर्यातीचा आकडा(कोटी रुपयांत)दागिन्याचा प्रकार कालावधी निर्यात +/-तयार दागिने जुलै २०१६ ते मे २०१७ २३,५९९जुलै २०१७ ते मे २०१८ २०,०५२ -१५%पॉलिश हिरे जुलै २०१६ ते जानेवारी २०१७ ८६,२४६जुलै २०१७ ते जानेवारी २०१८ ८६,३८९ ०.१७%(३ टक्के जीएसटी)फेब्रुवारी २०१७ ते मे २०१७ ५२,५९३फेब्रुवारी २०१८ ते मे २०१८ ५६,४८१ ७.३९%(०.२५ टक्के जीएसटी)
जीएसटीमुळे दागिन्यांच्या निर्यातीत झाली १५% घट; ३% दरामुळे प्रतिकूल परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 4:43 AM