Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीमुळे सोन्याच्या आयातीत २९ टक्के घट  

जीएसटीमुळे सोन्याच्या आयातीत २९ टक्के घट  

जीएसटी अंमलात आल्यापासून सोन्याच्या अवैध व्यवहारात वाढ झाल्याने प्रामाणिक व्यापारी चिंतेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:54 AM2018-07-12T05:54:12+5:302018-07-12T05:54:29+5:30

जीएसटी अंमलात आल्यापासून सोन्याच्या अवैध व्यवहारात वाढ झाल्याने प्रामाणिक व्यापारी चिंतेत आहेत.

 GST decreases 29% in gold imports | जीएसटीमुळे सोन्याच्या आयातीत २९ टक्के घट  

जीएसटीमुळे सोन्याच्या आयातीत २९ टक्के घट  

नवी दिल्ली : जीएसटी अंमलात आल्यापासून सोन्याच्या अवैध व्यवहारात वाढ झाल्याने प्रामाणिक व्यापारी चिंतेत आहेत. सोन्यावर भारतात १0 टक्के आयात व ३ टक्के जीएसटी आकारला जातो. जीएसटी लागू होताच २0१७ साली सोने आयातीत ५0 टक्क्यांपर्यंत घट झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत आयातीतली ही घट २९ टक्के आहे.
दुसरीकडे विमानतळांवर तस्करीतून येणारे सोने मोठ्या प्रमाणावर पकडले जाऊ लागल्याने अवैध उलाढाल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जीएसटी आकारल्यानंतर सरकारला अशी अपेक्षा होती की, सोन्याचे व्यवहार अधिक पारदर्शी होतील व ही बाजारपेठ अधिक संघटित बनेल, पण सोन्यावर अधिक कर लावल्यामुळे व्यापाऱ्यांना भीती वाटू लागली की, याचा चोरटा व्यापार करणारे कर वाचविण्यासाठी नवे मार्ग शोधतील व सोन्याच्या तस्करीत वाढ होईल. त्यांची भीती खरी ठरली आहे. अवैध उलाढाल वाढण्यामागे मुख्य कारण आहे की, सरकार विविध टप्प्यांवरच्या सोने व्यवहारांचा तपास करण्यास असमर्थ आहे. जीएसटीपूर्वी अशी चौकशी होत असे.
सोन्याच्या जुन्या दागिन्यांच्या खरेदीवर सध्या जीएसटी लागू नाही. ही सूट गैरव्यवहार करणाºयांच्या पथ्यावर पडली आहे. अवैध पद्धतीने खरेदी केलेले सोने जुन्या दागिन्यांचे आहे, असे दाखवून करात सूट मिळविली जाते. दोन लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या दागिन्यांच्या बाबतीत हा खेळ अधिक होतो. कारण त्यात पॅन क्रमांक द्यावा लागत नाही. केअर रेटिंग एजन्सीतले अर्थतज्ज्ञ म्हणतात की, भारत अनेक वर्षांपासून जगात सोन्याचा दुसºया क्रमांकाचा आयात करणारा देश आहे. अलीकडे मात्र आयातीत मंदी जाणवते आहे. हे व्यवहार असंघटित मार्गाने होत आहेत.

महसूल घटला

तस्करी व बेकायदेशीर मार्गाने येणाºया सोन्यामुळे तेलंगणा व आंध्र प्रदेशचा महसूल घटला आहे. महसुली उत्पन्नात दोन्ही राज्यांना ५00 ते ८00 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. गुप्तचर महसूल संचलनालयाने तस्करीचे साडे दहा कोटी रूपये किमतीचे सोने अलीकडेच जप्त केले आहे.

Web Title:  GST decreases 29% in gold imports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.