नवी दिल्ली - जानेवारी 2018 या महिन्यात जीएसटीमधून 86, 318 कोटी रुपये सरकारकडे जमा झाले आहेत. डिसेंबर 2017 च्या तुलनेत ही आकडेवारी आधिक आहे. जानेवारीमध्ये 57.78 लाख जीएसटीआर 3 बी रिटर्न झाली. जी एकूण करदात्यांच्या 69 टक्के आहे. सरकारने जीएसटीच्या या आकड्यावरीसोबतच प्रत्येक राज्याच्या करदात्याचा डेटा जाहीर केला आहे. जीएसटी कर भरण्यामध्ये पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरात सर्वात पुढे आहेत.
जानेवारीमधील जीएसटीआर 3बी भरण्याची शेवटची मुदत 20 फेब्रुवारी 2018 होती. जानेवारी 2018 मधील जीएसटीद्वारे 86318 कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये 14223 कोटी केंद्रीय जीएसटी आमि 19961 कोटी राज्य सरकारचा असा वाटा आहे. 43,794 कोटी आईजीएसटीमधून मिळाले आहेत. तर 8331 कोटी कंपनसेशन सेस मधून वसूल करण्यात आले आहे.
25 फेब्रुवारी 2018 पर्यंत 1.03 कोटी टॅक्सपेअर्सने जीएसटीची नोंदणी केली आहे. जवजवळ 17.65 लाख उद्योगपतींनी कंपोजिशन डिलर साठी रजिस्ट्रेशन केलं आहे. 25 फेब्रुवारी 2018 पर्यंत 16.42 लाख उद्योगपत्तींनी कंम्पोजिशन स्कीमची निवड केली आहे.
केंद्र सरकारनं जीएसटीमधून जमा झालेल्या आकडेवारीसह प्रत्येक राज्याचा टॅक्सपेअर्सचा (करदाते) डेटा जाहीर केला आहे. करदात्यामध्ये महाराष्ट्र सर्वात अव्वल आहे. मात्र कर भऱणाऱ्यामध्ये पंजाबनं बाजी मारली आहे. जीएसटी कर भरणाऱ्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब आणि महाराष्ट्रामधून 70 टक्केंपेक्षा आधिक जीएसटी कर भरला जातो.