Lokmat Money > बिझनेस न्यूज > एप्रिलमध्ये जीएसटी ‘फुल्ल’, महिन्याभरात १ लाख कोटी रुपयांची वसुली

एप्रिलमध्ये जीएसटी ‘फुल्ल’, महिन्याभरात १ लाख कोटी रुपयांची वसुली

एप्रिल २०१८ या महिन्याभरात वस्तू व सेवा कर(जीएसटी)ची वसुली १ लाख कोटी रुपये झाली आहे़ जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ही वसुली झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:56 AM2018-05-02T05:56:35+5:302018-05-02T05:56:35+5:30

एप्रिल २०१८ या महिन्याभरात वस्तू व सेवा कर(जीएसटी)ची वसुली १ लाख कोटी रुपये झाली आहे़ जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ही वसुली झाली आहे.

GST 'ful' in April, Recovery of Rs. 1 lakh crores in a month | एप्रिलमध्ये जीएसटी ‘फुल्ल’, महिन्याभरात १ लाख कोटी रुपयांची वसुली

एप्रिलमध्ये जीएसटी ‘फुल्ल’, महिन्याभरात १ लाख कोटी रुपयांची वसुली

नवी दिल्ली : एप्रिल २०१८ या महिन्याभरात वस्तू व सेवा कर(जीएसटी)ची वसुली १ लाख कोटी रुपये झाली आहे़ जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ही वसुली झाली आहे़ जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये नाराजी होती़ तरीही महिन्याभरात एवढी मोठी वसुली झाल्याने, केंद्र सरकारने समाधान व्यक्त केले आहे़
देशभरात एकूण ८७़१२ लाख करदाते आहेत, यांपैकी ६०़४७ लाख करदात्यांनी जीएसटीआर-३ बी अंतर्गत जीएसटी भरला़ त्यामुळे ६९़५ टक्के वसुली होऊ शकली़ एप्रिल महिन्यात व्यापारी तिमाही रिटर्न्स भरतात़ १९़३१ व्यापाऱ्यांपैकी ११़४७ व्यापाºयांनी त्यांचे रिटर्न्स (जीएसटीआर-४) भरले़ याद्वारे ५९़६० टक्के वसुली झाली व त्यातून ५७९ कोटी रुपये जीएसटी मिळाला़
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात १ लाख ३ हजार ४५८ कोटी रुपये जीएसटी मिळाला़ केंद्रीय वस्तू व सेवा करातून आतापर्यंत १८,६५२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे़ राज्य वस्तू व सेवा करातून २५ हजार ७०४ कोटी रुपयांची वसुली झाली़ हा सर्व एकत्रित जीएसटी ५० हजार ५४८ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाला़, तसेच सेस ८,५५४ कोटी रुपये वसूल झाला़
जीएसटीद्वारे सरकारला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी करदात्यांचे आभार मानले़ ते म्हणाले, जीएसटीला मिळालेले हे ऐतिहासिक यश आहे़
आॅगस्ट २०१७ ते मार्च २०१८ या काळात जीएसटीद्वारे ७़१९ लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला होता़ जुलैमधील वसुली मिळून २०१७-१८मध्ये जीएसटीद्वारे एकूण ७़४१ लाख कोटी रुपयांची वसुली झाली होती़ यात १़७३ लाख कोटींचा सीजीएसटी, १़७२ लाख कोटींचा एसजीएसटी व ३़६६ लाख कोटींचा आयजीएसटी (आयातीवरील १़७३ लाख कोटी रुपये धरून) आहे़

जीएसटीशिवाय ६२ हजार २१ कोटी रुपये उपकराचेही (आयातीवरील ५,७०२ कोटींसह) सरकारला मिळाले आहेत़ आॅगस्ट ते मार्च या काळात सरासरी मासिक वसुली ८९ हजार ८८५ कोटी रुपये राहिली आहे़

Web Title: GST 'ful' in April, Recovery of Rs. 1 lakh crores in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी