Join us

जीएसटीतून मिळाले ७.४१ लाख कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:20 AM

वित्त मंत्तालय : राज्यांना भरपाईपोटी दिले ४१,१४७ कोटी

नवी दिल्ली : २0१७-१८ या वित्त वर्षात सरकारला ७.४१ लाख कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) मिळाला. वित्त मंत्रालयाने टिष्ट्वटद्वारे ही माहिती दिली. गेल्या वर्षी १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी देशात सुरू झाली आहे.वित्त मंत्रालयाने म्हटले की, २0१७-१८ मध्ये आॅगस्ट २0१७ ते मार्च २0१८ या काळात जीएसटीद्वारे ७.१९ लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला. जुलैमधील वसुली मिळून २0१७-१८ मधील जीएसटीचा एकूण महसूल ७.४१ लाख कोटी रुपये होतो. यात १.१९ लाख कोटींचा सीजीएसटी, १.७२ लाख कोटींचा एसजीएसटी आणि ३.६६ लाख कोटींचा आयजीएसटी (आयातीवरील १.७३ लाख कोटी रुपये धरून) आहे. वित्त मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, २0१७-१८ या वित्त वर्षातील आठ महिन्यांच्या काळासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या भरपाईपोटी ४१,१४७ कोटी रुपये अदा करण्यात आले. २0१५-१६ हे आधार वर्ष धरून राज्यांचा महसूल १४ टक्क्यांच्या पातळीवर ठेवण्याचा निर्णय झालेला असून त्यानुसार केंद्राकडून राज्य सरकारांना भरपाई देण्यात येते.सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठ महिन्यांत राज्यांचे महसुली अंतर हळूहळू कमी होत आहे. गेल्या वर्षी सर्व राज्यांचे एकत्रित सरासरी महसुली अंतर १७ टक्के होते.महिन्याला सुमारे ९0 हजार कोटीयाशिवाय, ६२,0२१ कोटी रुपये उपकराचेही (आयातीवरील ५,७0२ कोटींसह) सरकारला मिळाले आहेत. आॅगस्ट ते मार्च या काळातील सरासरी मासिक वसुली ८९,८८५ कोटी रुपये राहिली आहे.

टॅग्स :जीएसटी