Join us  

जीएसटी : कसे आणि काय बघाल?

By admin | Published: January 16, 2017 12:13 AM

‘अप्रत्यक्ष कर’ संकल्पना स्वातंत्र्यानंतर प्रथमच क्रांतिकारी बदलाला सामोरी जाणार आहे.

- अ‍ॅड. विद्याधर आपटे२०१७ हे वर्ष एका मोठ्या बदलाला सामोरे जाणार आहे. ‘अप्रत्यक्ष कर’ संकल्पना स्वातंत्र्यानंतर प्रथमच क्रांतिकारी बदलाला सामोरी जाणार आहे. ‘कर’ म्हटले की ‘प्राप्तिकर’ आठवतो. उत्पन्नातील काही हिस्सा ‘कर’ स्वरूपात सरकारला जमा करावा लागत असल्याने त्याची दखल नक्कीच अधिक घेतली जाते. मात्र ‘अप्रत्यक्ष कर’ अधिक प्रमाणात व अजाणतेपणे भरत असतो. वस्तू अथवा सेवेचे उत्पादन, विक्री, पुरवठा करतेवेळी उत्पादक, विक्रेते, सेवा पुरवठादार त्या वस्तू अथवा सेवेच्या किमतीतच कर समाविष्ट करतो, हे आपल्या ध्यानीमनी नसते. थोडक्यात, आपणही वस्तू वा सेवा खरेदी करत असताना हा कर अप्रत्यक्षपणे भरतो. ‘अप्रत्यक्ष कर’ वेगवेगळ्या गटांत विभागलेला असतो. उदा. उत्पादन कर, विक्री कर, सेवा कर इ. केंद्रीय आणि राज्य सरकार पातळीवर अशा वेगवेगळ्या गटनिहाय अप्रत्यक्ष करांसाठी वेगवेगळी प्रणाली असते. ती या २०१७मध्ये ‘एकत्र’ पातळीवर केली जाणार आहे. ‘अप्रत्यक्ष करांना’ एकाच गटात समाविष्ट केले जाणार आहे. तो ‘वस्तू आणि सेवांवरील कर (ॠङ्मङ्म२ि ंल्ल िरी१५्रूी२ ळं७-ॠरळ) म्हणून ओळखला जाईल. केंद्र सरकार जीएसटीची अंमलबजावणी कधी करेल, हे स्पष्ट नसले तरी ती १६ सप्टेंबर २०१७पूर्वी करावी लागेल. उत्पादक, विक्रेते, सेवापुरवठादार यांच्यात ‘जीएसटी’विषयी संभ्रम आहे. होणारा बदल चांगला असेल की वाईट याचा विचार न करता तो अंमलात आणावा लागणार आहे. त्याचा परिणाम वस्तू व सेवेच्या किमतीवर होणार असल्याने जागरूक नागरिक म्हणून त्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. वस्तू वा सेवेच्या किमती कमी होतील की अधिक, हे सुरुवातीला कळणार नाही. त्यामुळे आपल्याला हा कर ‘अप्रत्यक्षपणे’ भरावा लागणार आहे या जाणिवेने त्या बदलाकडे बघावे लागेल. या लेखमालेद्वारे ‘जीएसटी’विषयीची माहिती, तरतुदी, संक्रमणकाळात उत्पादक, विक्रेते वगैरे मंडळींना घ्यावयाची काळजी, सरकारी अधिसूचना, खुलासे यांचा नेमका आणि थेट अर्थ काय असेल, सर्वसामान्य खरेदीदाराची परवड होईल की सुखावह ठरेल, सरकारी दफ्तरी ‘करनिर्धारण’ कसे असेल, सर्वसमावेशक प्रणाली कशी अंमलात येईल, दुर्लक्ष केल्याने कुठले गंभीर परिणाम होऊ शकतात? या व अशा सर्व विषयांचा परामर्श घेणार आहोत. कुठलाही व्यवसाय करताना व्यापारी आराखडे, गणिते याबरोबर येणाऱ्या ‘जीएसटी’विषयी जुजबी पण नेमकी माहिती गोळा करून ठेवली तर त्याचा फायदा उत्पादक, विक्रेते, सेवा पुरवठादार व सर्वसामान्यांनाही होईल. म्हणूनच याला आपण ‘इलाजापूर्वी वा इलाज करावा लागू नये म्हणून खबरदारी’ असे म्हणू शकतो. या वर्षी जीएसटी लागू होईल. या कराची अंमलबजावणी कशी होणार, हा बदल चांगला असेल की वाईट हे स्पष्ट व्हायचे असले तरी या साऱ्यांचा परामर्श घेणारी ही मालिका आजपासून.जीएसटीकरण(भाग १ क्रमशा..)