Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतीवर जीएसटीच्या दराचा प्रभाव

शेतीवर जीएसटीच्या दराचा प्रभाव

येत्या १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू होणार आहे. या नव्या करप्रणालीमुळे अनेक वस्तूंवरील करांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे काही

By admin | Published: June 15, 2017 02:26 AM2017-06-15T02:26:00+5:302017-06-15T02:26:00+5:30

येत्या १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू होणार आहे. या नव्या करप्रणालीमुळे अनेक वस्तूंवरील करांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे काही

GST influence on agriculture | शेतीवर जीएसटीच्या दराचा प्रभाव

शेतीवर जीएसटीच्या दराचा प्रभाव

- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंट

येत्या १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू होणार आहे. या नव्या करप्रणालीमुळे अनेक वस्तूंवरील करांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे काही वस्तू आणि काही सेवा स्वस्त अथवा महाग होणार आहेत. आपल्या जीवनाशी संबंधित अशाच काही वस्तू आणि सेवांवर जीएसटीचा कसा प्रभाव पडणार याबद्दल खास सदर सुरू करत आहोत. त्याची ही सुरुवात अन्नदाता शेतकऱ्यांपासून...

खत : सध्या चालू असलेल्या व्हॅट कायद्यात शेतीसाठी लागणाऱ्या सेंद्रिय खतावर ० टक्के दर आणि इतर खतावर
६ टक्के दर लागत होता व एक्साईज ड्युटी ही १२.५० टक्के या दराने लागत होती. आता जीएसटी अंतर्गत तो दर युनिट कंटेनरमध्ये न ठेवलेल्या आणि ब्रँड नेम नसलेल्या सेंद्रिय खतावर ० टक्के दर, युनिट कंटेनरमध्ये ठेवलेल्या आणि ब्रँड नेम असलेल्या सेंद्रिय खतावर ५ टक्के दर, खते जे की, स्पष्टपणे खते म्हणून वापरले जाणार नाही, अशा खतावर १२ टक्के दर आणि सर्व वस्तू ज्या की स्पष्टपणे खते म्हणून वापरल्या जाणार नाहीत अशांवर १८ टक्के कर आकारण्यात आला आहे.

कीटकनाशके : सध्या कीटकनाशकावर ६ टक्के व्हॅट आणि एक्साईज ड्युटी १२.५० टक्के आकारली जात होती. जी आता जीएसटी अंतर्गत १८ टक्के आकारण्यात येईल.

ट्रॅक्टर : शेतीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर व त्याच्या अ‍ॅक्सेसरीजवर ६ टक्के व्हॅट व एक्साईज ड्युटी १२.५० टक्के आकारली जात होती. ती आता जीएसटी अंतर्गत १८ टक्के कर ट्रॅक्टरवर आणि त्याच्या अ‍ॅक्सेसरीजवर २८ टक्के दर राहील.

तांदूळ, गहू, दूध, ताजी भाजीपाला, फळे इ. शेती विषयक वस्तूंवर ०% दर राहील.

भाजीपाला आणि फळांचा रस यांवर सध्या ६ टक्के कर आकारला जात होता. आता जीएसटी अंतर्गत तो १२ टक्के राहील.

फळांचा ज्याम, जेली, मुरंबा इत्यादीवर व्हॅट अंतर्गत
६ टक्के कर आकारला जात होता.
आता जीएसटी अंतर्गत तो

18%
केला आहे.

- दुग्धशाळा, पोल्ट्री शेती
आणि स्टॉक प्रजनन शेतीच्या परिभाषेबाहेर ठेवली आहे. त्यामुळे हे जीएसटी अंतर्गत करपात्रमध्ये करपात्र राहणार आहे.

शेतकरी व्याख्या : शेतकरी म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एका हिंदू अविभक्त कुटुंबाचा सदस्य जो जमिनीची लागवड करतो
- स्वत:च्या श्रमाद्वारे किंवा कुटुुंबाकडून श्रम करून घेणारा
- रोख रकमेत किंवा वस्तूच्या स्वरूपात मजुरी देऊन वैयक्तिक देखरेखीखाली किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या देखरेखीखाली काम करून घेणारी व्यक्ती. शेती करणारा व शेतीमाल विकणारा यावर जीएसटी अंतर्गत कर लागणार नाही.

रेल्वेद्वारे भारतामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी माल वाहतूक करणारी सेवा आणि माल वाहतूक एजन्सीद्वारे पुरविल्या जाणाऱ्या माल वाहतूक सेवा म्हणजेच शेती उत्पादन वस्तू, दूध, मीठ, अन्नधान्य, तांदळासह सेंद्रिय खते यावर जीएसटी अंतर्गत एक्झम्शन आहे.

- शेती उत्पादनासंदर्भातील आणि जनावरांच्या संगोपनासंदर्भातील, घोड्याच्या संगोपनाशिवाय पुरविल्या जाणाऱ्या सेवा
- कृषी शेती विषयक कामात, कोणत्याही शेती उत्पादनासंबंधित शेतीचीच लागवड, कापणी, नांगरणी, वनस्पती संरक्षण यासंबंधी सेवा
- शेत मजूर पुरवठा आणि कृषी यंत्रे भाड्याने देण्याची सेवा यावर जीएसटी अंतर्गत एक्झम्शन आहे.

Web Title: GST influence on agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.