- उमेश शर्मा(चार्टर्ड अकाउंटंट)अर्जुन : कृष्णा, प्रत्येक महिन्यात करदाते त्यांचा जीएसटी रिटर्न नियमित भरतात; पण, ऑक्टोबरचा रिटर्न खास महत्त्वाचा का असतो? कृष्ण : अर्जुना, ऑक्टोबरच्या जीएसटी रिटर्नसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण त्यानंतर काही ॲडजस्टमेंट्स करण्याची संधी मिळत नाही. यावेळी करदात्यांनी त्यांच्या बुक्सचं रिटर्नसोबत जुळवून पाहणं, ITC रिव्हर्सल आणि इतर रिपोर्टिंगवर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे.अर्जुन : कृष्णा, ऑक्टोबर २०२४ चा रिटर्न भरताना करदात्यांनी कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत? कृष्ण : १. करदात्यांनी खात्री करावी की त्यांचे बुक्स हे GSTR-१ आणि GSTR-३B मधील आउटवर्ड सप्लाइज सोबत जुळते आहे. काही फरक असल्यास ऑक्टोबरच्या रिटर्नमध्ये त्याची सुधारणा करावी. जसे की सुटलेल्या इनव्हॉइसचा समावेश करणे किंवा ओव्हर-रिपोर्ट केलेल्या इनव्हॉइसचे मूल्य कमी करणे.२. वस्तू व सेवांवरील ITC ची वार्षिक तपासणी करणे गरजेचे आहे आणि कमी किंवा जास्त रिव्हर्सल किंवा क्लेम असेल तर त्याची ॲडजस्टमेंट ऑक्टोबरच्या रिटर्नमध्ये करायला हवी.३. क्रेडिट नोट्स इश्यू करण्याबाबत : आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ओव्हरचार्ज केलेला कर किंवा जास्त कर आकारलेल्या मूल्याच्या इनव्हॉइससाठी क्रेडिट नोट्स फक्त ऑक्टोबर २०२४ पर्यंतच दिले जाऊ शकतात.४. नियम ३६(४) नुसार करदात्यांनी त्यांच्या ITC क्लेम्सची GSTR-२B शी जुळवणी करावी, ज्यामुळे सप्लायर्सनी दिलेली माहिती तपासता येईल. यानंतर क्लेम न केलेला ITC किंवा ॲक्सेस क्लेम केलेला ITC ऑक्टोबरच्या रिटर्नमध्ये करदाते क्लेम किंवा रिव्हर्स करू शकतात.उदाहरणार्थ, जर सप्लायर्सनी GSTR-१ मध्ये २,५०० रुपये कर दाखवला असेल, पण करदात्याने चुकून २,००० रुपये क्लेम केला असेल तर ऑक्टोबर २०२४ च्या रिटर्नमध्ये ५०० रुपयांचा ITC क्लेम करता येईल.५. जर करदात्याने चुकून B२B इनव्हॉइस B२C म्हणून किंवा उलट वर्गीकृत केला असेल, तर आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या इनव्हॉइससाठी ऑक्टोबरचा रिटर्न ही शेवटची संधी आहे. कारण यामुळे योग्य क्रेडिट फ्लो व अचूक रिपोर्टिंग सुनिश्चित करता येते.
GST: आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी शेवटची संधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 8:06 AM