Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू, रेस्टॉरंटस् चालकांकडून स्वागत

जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू, रेस्टॉरंटस् चालकांकडून स्वागत

२०० वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये कपात करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू झाली आहे. त्याबरोबर रेस्टॉरंटमधील जेवण स्वस्त झाले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:37 AM2017-11-17T00:37:37+5:302017-11-17T00:37:50+5:30

२०० वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये कपात करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू झाली आहे. त्याबरोबर रेस्टॉरंटमधील जेवण स्वस्त झाले आहे.

 GST launches new tariffs, welcome from restaurant operators | जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू, रेस्टॉरंटस् चालकांकडून स्वागत

जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू, रेस्टॉरंटस् चालकांकडून स्वागत

नवी दिल्ली : २०० वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये कपात करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू झाली आहे. त्याबरोबर रेस्टॉरंटमधील जेवण स्वस्त झाले आहे. रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांवर आता ५ टक्केच कर आकारण्यात येत आहे. या निर्णयाचे किरकोळ अपवाद वगळता सर्व रेस्टॉरंटस् संघटनांनी स्वागत केले आहे.
इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे आदर्श शेट्टी यांनी हा निर्णय सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, रेस्टॉरंटमधील खाद्य वस्तूंवरील इनपुट टॅक्स के्रडिटची सवलत रद्द करण्यात आल्यामुळे नॅशनल रेस्टॉरंटस् असोसिएशन आॅफ इंडियाने नाराजी व्यक्त केली आहे. क्रेडिट सवलत रद्द केल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती ६ टक्क्यांनी वाढू शकतात, असे या संघटनेने म्हटले आहे.
रामविलास पासवान यांनी म्हटले की, जीएसटी दरात कपात करण्यात आल्यामुळे स्वस्त झालेल्या २०० वस्तूंवर बदललेली किंमत टाकणे उत्पादकांना बंधनकारक आहे.
कमी झालेली किंमत दर्शविण्यासाठी उत्पादक स्टिकर्स चिकटवू शकतात.
वॉशिंग पावडर व रेझरपासून शांपू व घड्याळांपर्यंत अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. लोकांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.
..............

Web Title:  GST launches new tariffs, welcome from restaurant operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.