नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर व्यवहार्य करण्यासाठी नेमण्यासाठी आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत गुरुवारी जीएसटीची ४ टप्प्यांची (स्लॅब) सध्याची संरचना कायम ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावर व्यापक सहमती होऊ शकते. काही वस्तूंच्या जीएसटी दरात कपात करण्याच्या मुद्द्यावरही मंत्रिगटाने चर्चा केली आहे.
काही वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केल्यास काय परिणाम होतील, याचे विश्लेषण ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना मंत्रिगटाने केल्या आहेत. आरोग्य व विमा यांवरील जीएसटी कमी करण्याचा मुद्दा फिटमेंट समितीकडे सोपविण्याची सूचना करण्यात आली.