नवी दिल्ली : जीएसटीसंबंधी ‘जीएसटीएन’ हे पोर्टल अथडळ्यांनी भरलेले आहे. अनेक प्रयत्नानंतरही हे अडथळे दूर झालेले नाहीत. त्यामुळे तंत्रज्ञान स्तरावर जीएसटी अयशस्वी ठरला आहे, अशी कबुली खुद्द केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनीच दिली आहे.
जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्रकारांशी बोलताना अढीया म्हणाले, जीएसटी हा तंत्रज्ञानावर आधारित कर आहे. करदात्यांची नोंदी, बिल तयार करणे, कराचा परतावा, कर भरणा हे सारे काही आॅनलाइन पोर्टलवरच होते. त्यामुळे तंत्रज्ञान हा या ऐतिहासिक
कर प्रणालीचा अविभाज्य भाग आहे. हे तंत्रज्ञान त्रुटीमुक्त असावे
यासाठी अनेक कुशल व्यक्ती सातत्याने प्रयत्नरत आहेत. पण प्रश्न मिटलेला नाही.
जीएसटी हा भारतीय कर प्रणालीत करण्यात आलेला आजवरचा सर्वात मोठा बदल होता. त्याचे सकारात्मक निकाल येण्यासाठी हा कर अधिकाधिक सोपा करण्यात आला. पण अद्यापही सुधारणा करण्यास मोठा वाव आहे.
क्लिष्टतेमुळे करदातेच नाराजच
जीएसटीची १ जुलैला वर्षपूर्ती झाली. यानिमित्ताने अर्थ मंत्रालयाने सर्वेक्षण केले. त्यामध्ये जीएसटी व जीएसटी पोर्टलबाबत करदाते नाराज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. ५० टक्के करदात्यांना अद्यापही जीएसटी पोर्टल हाताळणीत अडथळे येत आहेत.
जीएसटी पोर्टलमध्ये अनेक बदल केल्यानंतरही करदात्यांना ही प्रणाली अत्यंत क्लिष्ट वाटते. पोर्टल हाताळणी वेळखाऊ व खर्चिक असल्याचे मत उद्योजक व व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे. जीएसटीला अधिक सोपे करुन केवळ एकदाच त्याचा भरणा करण्याची सोय सरकारने उपलब्ध करावी, अशी अपेक्षा करदात्यांनी व्यक्त केली आहे.
जीएसटीचे पोर्टल अडथळ्यांनी भरलेले, केंद्रीय अर्थ सचिवांची कबुली
जीएसटीसंबंधी ‘जीएसटीएन’ हे पोर्टल अथडळ्यांनी भरलेले आहे. अनेक प्रयत्नानंतरही हे अडथळे दूर झालेले नाहीत. त्यामुळे तंत्रज्ञान स्तरावर जीएसटी अयशस्वी ठरला आहे, अशी कबुली खुद्द केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनीच दिली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 03:23 AM2018-07-07T03:23:15+5:302018-07-07T03:25:45+5:30