Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीचा दर, सीमा ठरविणे मुख्य आव्हान

जीएसटीचा दर, सीमा ठरविणे मुख्य आव्हान

वस्तू व सेवा कर (जीएसटी)प्रणालीत कराचा दर काय असावा, त्याची व्यावसायिक सीमा काय असावी, कोणत्या वस्तूंना या करातून वगळण्यात यावे

By admin | Published: August 5, 2016 04:40 AM2016-08-05T04:40:10+5:302016-08-05T06:35:10+5:30

वस्तू व सेवा कर (जीएसटी)प्रणालीत कराचा दर काय असावा, त्याची व्यावसायिक सीमा काय असावी, कोणत्या वस्तूंना या करातून वगळण्यात यावे

The GST rate, the main challenge to settle the borders | जीएसटीचा दर, सीमा ठरविणे मुख्य आव्हान

जीएसटीचा दर, सीमा ठरविणे मुख्य आव्हान


नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी)प्रणालीत कराचा दर काय असावा, त्याची व्यावसायिक सीमा काय असावी, कोणत्या वस्तूंना या करातून वगळण्यात यावे, यांसारखे ७ मुद्दे या करप्रणालीच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आव्हान ठरणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी केले.
१ एप्रिल २0१७पासून जीएसटी करप्रणाली लागू करायची आहे. त्यापूर्वीच वरील सर्व मुद्द्यांवर निर्णय घ्यावा लागणार आहे. अधिया यांनी सांगितले की, या मुद्द्यांवर निर्णय घेणे ही एक कसोटीच असणार आहे. प्रमुख आव्हानांमध्ये केंद्र आणि राज्यांच्या महसुलाचा आधार ठरविणे, राज्यांना द्यावयाची भरपाई, जीएसटी दरांची रचना, जीएसटीमधून सूट द्यावयाच्या वस्तू आणि सेवांची यादी, आदर्श जीएसटी विधेयकावर सहमती, व्यवसाय सीमा, विविध प्रकारच्या अन्य सीमा ठरविणे आणि दुहेरी नियंत्रणाचा प्रभाव कमी करणे यांचा समावेश आहे.
अधिया म्हणाले की, सध्याच्या संयुक्त उत्पादन शुल्कापेक्षा जीएसटी दर कमी कसा राहील याचा निर्णय जीएसटी परिषद घेईल. राज्यांना किती नुकसानभरपाई द्यायची याचा निर्णय जीएसटी दर ठरल्यानंतरच घेता येऊ शकेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The GST rate, the main challenge to settle the borders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.