नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराची (जीएसटी) वसुली मे महिन्यात १ लाख कोटी रुपयांच्या खाली घसरून ९४,०१६ कोटी रुपयांवर आली. वित्त मंत्रालयाच्या वतीने ही आकडेवारी जारी करण्यात आली. एप्रिलमध्ये जीएसटी वसुली पहिल्यांदाच १ लाख कोटी रुपयांच्या वर गेली होती.
एकूण वसुलीत केंद्रीय जीएसी (सी-जीएसटी) १६,८६६ कोटी, राज्य जीएसटी (एस-जीएसटी) २१,६९१ कोटी, एकात्मिक जीएसटी ४९,१२० कोटी (आयातीवरील २४,४४७ कोटींसह) आणि उपकर ७,३३९ कोटी (आयातीवरील ८५४ कोटींसह) यांचा समावेश आहे.
एप्रिल महिन्यासाठी ३१ मेपर्यंतच्या मुदतीत एकूण ६२.४७ लाख जीएसटीआर-३बी रिटर्न दाखल झाले. तडजोडीनंतर केंद्र व राज्य सरकारांना प्राप्त झालेला मे महिन्यातील महसूल सी-जीएसटीपोटी २८,७९७ कोटी आणि एस-जीएसटीपोटी ३४,०२० कोटी रुपये राहिला.
मार्च महिन्यातील भरपाईपोटी राज्य सरकारांना ६,६९६ कोटी रुपये २९ मे रोजी केंद्र सरकारने जारी केले. वित्त वर्ष २०१७-१८ साठी एकूण ४७,८४४ कोटी रुपयांची भरपाई राज्य सरकारांना देण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात जीएसटी
वसुली पहिल्यांदाच १ लाख कोटी रुपयांच्या वर गेली होती. एकूण १,०३,४५८ कोटी रुपयांचा जीएसटी एप्रिलमध्ये वसूल झाला होता. त्यातील सी-जीएसटीचा वाटा १८,६५२ कोटी, एस-जीएसटीचा वाटा २५,७०४ कोटी, आयजीएसटीचा वाटा ५०,५४८ कोटी आणि उपकराचा वाटा ८५५४ कोटी रुपये होता.
वित्त मंत्रालयाने म्हटले की, वर्षअखेरच्या प्रभावामुळे एप्रिलमधील महसुलाचा आकडा वाढलेला होता.
मार्चमधील वसुली ८९,२६४ कोटी रुपये होती. २०१७-१८ या वित्त वर्षात एकूण जीएसटी वसुली ७.४१ लाख कोटी रुपये राहिली.
एक लाख कोटींच्या खाली जीएसटी वसुली, फक्त एप्रिलमध्येच झाली होती वाढ
वस्तू व सेवाकराची (जीएसटी) वसुली मे महिन्यात १ लाख कोटी रुपयांच्या खाली घसरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:33 AM2018-06-02T05:33:59+5:302018-06-02T05:33:59+5:30