Lokmat Money > बिझनेस न्यूज > हळदीच्या कमिशन एजंट्सना जीएसटीत दिलासा

हळदीच्या कमिशन एजंट्सना जीएसटीत दिलासा

GST : शेतीमाल; त्यात हळदीच्या विवादासंबंधित  सातारा, सांगली आणि हिंगोली इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र अपील प्राधिकरणाने नुकताच जारी केलेला आदेश काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 08:45 AM2022-06-06T08:45:04+5:302022-06-06T08:45:20+5:30

GST : शेतीमाल; त्यात हळदीच्या विवादासंबंधित  सातारा, सांगली आणि हिंगोली इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र अपील प्राधिकरणाने नुकताच जारी केलेला आदेश काय आहे?

GST relief to turmeric commission agents | हळदीच्या कमिशन एजंट्सना जीएसटीत दिलासा

हळदीच्या कमिशन एजंट्सना जीएसटीत दिलासा

- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंट 

अर्जुन : कृष्णा, शेतीमाल; त्यात हळदीच्या विवादासंबंधित  सातारा, सांगली आणि हिंगोली इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र अपील प्राधिकरणाने नुकताच जारी केलेला आदेश काय आहे?
कृष्णा : अर्जुन, वस्तू आणि सेवा कराच्या निर्णयासाठी महाराष्ट्र अपील प्राधिकरणाने APMC मधील व्यापाऱ्यांना हळदीचा पुरवठा करण्यासंदर्भात कमिशन एजंटव्दारे प्रदान केलेल्या सेवांच्या करपात्रतेबाबत आदेश जारी केला आहे.
अर्जुन : कृष्णा, शेतकऱ्यांसाठी हळदीची करपात्रता काय आहे? 
कृष्णा : अर्जुन, नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार शेतकरी हळद विक्रीसाठी बाजारात आणतात. काढणीनंतरच्या काही प्रक्रिया, जसे की उकळणे, वाळवणे आणि पॉलिश करणे; ज्या सामान्यत: शेतकरी स्वत: शेतजमिनीतून काढलेल्या ताज्या हळदीवर करतात. ही प्रक्रिया शेतकरी स्वत:च त्यांच्या शेतजमिनीवर पार पाडतात, ज्यामुळे त्यांचे उत्पादन अधिक टिकाऊ, प्राथमिक बाजारपेठेसाठी विक्रीयोग्य बनते. वाळलेली हळद (संपूर्ण) वनस्पतीच्या लागवडीतून तयार होते. कच्च्या हळदीवर काढणीनंतरची ही प्रक्रिया हळदीच्या आवश्यक वैशिष्ट्यांमध्ये बदल करत नाही. अशाप्रकारे, हळद (संपूर्ण स्वरूपात हळद पावडर स्वरूपात नाही) ‘कृषी उत्पादन’च्या व्याख्येखाली समाविष्ट आहे. हळदीचा HSN कोड 0910 30 20 आणि जीएसटीचा दर ५ % (सीजीएसटी आणि एसजीएसटी प्रत्येकी २.५%) आहे. तथापि, शेतकऱ्यांनी हळदीचा पहिला पुरवठा करपात्र नसलेल्या व्यक्तीकडून केल्यास जीएसटी भरावा लागणार नाही. 
अर्जुन : कृष्णा, कमिशन एजंटसाठी हळदीची करपात्रता काय आहे? 
कृष्णा : अर्जुन, कृषी सेवांच्या अंतर्गत प्राथमिक बाजारपेठेत कृषी उत्पादनाच्या विक्री किंवा खरेदीसाठी कमिशन एजंटव्दारे पुरवलेल्या कोणत्याही कृषी उत्पन्न विपणन समिती किंवा मंडळाच्या सेवा तसेच एपीएमसी मार्केट जिथे शेतकरी हळद विकतात, ते प्राथमिक बाजारपेठेशिवाय दुसरे काहीही नाही. त्यामुळे एपीएमसीमध्ये हळद पुरवठ्यासाठी कमिशन एजंटने दिलेल्या सेवांसाठी जीएसटी भरावा लागणार नाही.

Web Title: GST relief to turmeric commission agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी