Join us

Gst: जीएसटी रिटर्न भरण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 5:34 AM

GST return: सप्टेंबर २०२१ या महिन्याचे जीएसटीचे रिटर्न भरताना कोणते १० मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत? 

- - उमेश शर्मा(चार्टर्ड अकाउण्टण्ट) अर्जुन (काल्पनिक पात्र) : सप्टेंबर २०२१ या महिन्याचे जीएसटीचे रिटर्न भरताना कोणते १० मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत? कृष्ण (काल्पनिक पात्र) : १.  रिकन्सीलिएशन : पुरवठादाराने आर्थिक वर्ष २०२१-२१साठी भरलेल्या रिटर्नमध्ये दाखवलेली विक्री आणि पुस्तकांमधील विक्री यामधील फरक रिकन्साईल करणे आवश्यक आहे. फरक असल्यास  जीएसटीआर-०१ आणि जीएसटीआर-३ बी मध्ये दुरूस्ती करावी.२. क्रेडिट नोट :  सप्टेंबरचे रिटर्न दाखल केल्यानंतर पुरवठादार त्या संबंधित क्रेडिट नोट जारी करू शकत नाही. मागील आर्थिक वर्षासंबंधित उलाढालीत जर बदल करायचा असेल तर  संबंधित क्रेडिट नोट त्याने जारी करावी.३. जीएसटीआर-०१ मध्ये सुधारणा : जीएसटीआर-०१ मध्ये बी२बी चे  इनव्हाॅईस जर बी२सी मध्ये चुकून दाखवले गेले असेल तर त्याची दुरूस्ती करावी.४. आयटीसी : प्राप्तकर्ता सप्टेंबर २०२१ महिन्याच्या रिटर्न भरण्याच्या तारखेनंतर आर्थिक वर्ष २०२०-२१च्या कोणत्याही इनव्हॉईसवरील आयटीसीचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे इनव्हॉईसवरील आयटीसीचा लाभ घेतला नसेल तर ते शोधून या रिटर्नमध्ये  लाभ घ्यावा.५. नियम ४२ आणि ४३ नुसार आयटीसीचे विभाजन : जर करदाता हा करपात्र पुरवठा आणि टॅक्स फ्री पुरवठा यात गुंतलेला असेल तर जीएसटीआर-३ बी दाखल करताना नियम ४२ आणि ४३ अंतर्गत एकूण उलाढालीच्या टॅक्स फ्री पुरवठा प्रमाणात प्राप्त केलेले इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्स  करावे.६. नियम ३७ नुसार आयटीसी रिवर्सल -  १८० दिवसांच्या आत पुरवठादाराला खरेदीसंदर्भात रक्कम दिली नसेल, तर  करदात्याने खरेदी पुरवठ्यावर इनपुट टॅक्स घेतला असेल, परंतु  पुरवठादाराला पैसे देण्यास अयशस्वी ठरला असेल तर न दिलेली रक्कम आणि इनपुट टॅक्स क्रेडिट रकमेच्या प्रमाणात घेतलेले इनपुट टॅक्स क्रेडिट इनव्हॉईसच्या तारखेपासून १८० दिवसांच्या कालावधीनंतर रिव्हर्स करणे आवश्यक आहे.७. आरसीएम अंतर्गत भरलेला कर : आरसीएम अंतर्गत लागू होणाऱ्या व्यवहारांसाठी जीएसटी योग्य दराने भरला आहे की नाही, याची फेरपडताळणी व खात्री योग्य रितीने करावी.

टॅग्स :जीएसटीव्यवसाय