Lokmat Money > बिझनेस न्यूज > कंपन्यांच्या भांडवलावर जीएसटीचा परिणाम

कंपन्यांच्या भांडवलावर जीएसटीचा परिणाम

कंपन्यांच्या खेळत्या भांडवलाच्या साखळीवर जीएसटीमुळे मोठा आघात होईल, त्यामुळे जीएसटीच्या सुरुवातीच्या चार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 12:17 AM2017-05-27T00:17:12+5:302017-05-27T00:17:12+5:30

कंपन्यांच्या खेळत्या भांडवलाच्या साखळीवर जीएसटीमुळे मोठा आघात होईल, त्यामुळे जीएसटीच्या सुरुवातीच्या चार

GST results on corporate capital | कंपन्यांच्या भांडवलावर जीएसटीचा परिणाम

कंपन्यांच्या भांडवलावर जीएसटीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कंपन्यांच्या खेळत्या भांडवलाच्या साखळीवर जीएसटीमुळे मोठा आघात होईल, त्यामुळे जीएसटीच्या सुरुवातीच्या चार महिन्यांच्या काळात खेळते भांडवल सहजपणे उपलब्ध राहील, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा निष्कर्ष एका अहवालात काढण्यात आला आहे.
भारतीय मानक संस्था इंडिया रेटिंगने हा अहवाल जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की, जीएसटी संक्रमणाच्या काळात व्यवसायांतील खेळत्या भांडवलाची साखळी विस्कळीत होईल.
त्यामुळे सुरुवातीच्या दोन ते चार महिन्यांच्या काळात या समस्येवर काही तरी उपाय करावा लागेल. ही साखळी विस्कळीत झाल्यामुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी व्यवस्थेत सहजपणे भांडवल खेळते राहील, हे पाहणे आवश्यक आहे. करव्यवस्थेतील अचानक बदलामुळे अर्थव्यवस्थेला जो धक्का बसणार आहे, तो सहन करण्यासाठीही अर्थव्यवस्थेतील वित्तीय तरलता राखणे आवश्यक आहे.
इंडिया रेटिंगने ११ हजार कंपन्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. अहवालात म्हटले आहे की, कंपन्यांकडे येणारा १ लाख कोटी रुपयांचा ओघ बंद होणार आहे. त्यापैकी ५0 हजार कोटी रुपये दोन महिन्यांसाठी बंद राहतील. त्यामुळे अल्पकाळासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज निर्माण होईल.
२0१६ वित्त वर्षाच्या अखेरीस ११.२ लाख कोटींच्या वस्तू उत्पादनाच्या विविध टप्प्यात होत्या. त्यावरून या समस्येची कल्पना यावी. सेवा कर अतिरिक्त ३ टक्के
वाढीसह १८ टक्के झाल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची गरज लागेल. ती भरून काढण्याची व्यवस्था करावी लागेल. अन्यथा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतील, असा इशारा
इंडिया रेटिंगने आपल्या अहवालात दिला आहे.


५0 हजार कोटी रुपये दोन महिन्यांसाठी बंद राहतील. त्यामुळे अल्पकाळासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज निर्माण होईल. सेवा कर अतिरिक्त ३ टक्के वाढीसह १८ टक्के झाल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची गरज लागेल.


इंडिया रेटिंगने ११ हजार कंपन्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. अहवालात म्हटले आहे की, कंपन्यांकडे येणारा १ लाख कोटी रुपयांचा ओघ बंद होणार आहे.

Web Title: GST results on corporate capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.