Join us

सर्व रेकॉर्ड ब्रेक! कोरोना संकटात मोदी सरकारला मोठा दिलासा; देशासाठी आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 5:50 PM

gst revenue collection new record rs 123902 crore in march 2021: जीएसटीमधून बंपर कमाई; जीएसटी लागू झाल्यापासून प्रथमच १.२३ लाख कोटी कर सकलन

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटका याचा थेट परिणाम कर संकलनावर झाला. सरकारला मिळणारा महसूल कमी होत असताना दुसऱ्या बाजूला वैद्यकीय सेवांवरील खर्च वाढला. त्यामुळे मोठी वित्तीय तूट निर्माण झाली. मात्र आता देशातील अर्थचक्र सुरळीत होताना दिसत आहे. मार्चमध्ये सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून १.२३ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल २७ टक्के इतकी आहे.कोरोना संकटात आनंदाची बातमी! मोदी सरकारला मोठा दिलासाकोरोना संकटाचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानामुळे लोकांनी हात आखडता घेतला. त्यामुळे मागणी घटली. मात्र आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मार्चमध्ये जीएसटीच्या माध्यमातून १.२३ लाख कोटींचं संकलन झालं. जीएसटीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात संकलन झालं आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याची स्थिती असताना अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येताना दिसत आहे.‘ऑटो डेबिट’ पेमेंट प्रणालीला RBI ची मुदतवाढ; ग्राहकांना मोठा दिलासाबोगस बिलांच्या माध्यमातून करवसुली करणाऱ्या यंत्रणेला गंडा घालण्याचे उद्योग थांबवण्याकडे अर्थ मंत्रालयानं विशेष लक्ष दिलं. जीएसटी, प्राप्तिकर, सीमा शुल्क यांच्याकडून मिळणाऱ्या दस्तावेजाचा वापर करून बोगस बिलिंग करणाऱ्यांविरोधात महत्त्वाची पावलं उचलण्यात आली. त्याचा थेट परिणाम कर संकलनावर झाला. जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत कधीही इतक्या प्रमाणात कर संकलन झालेलं नाही.करवसुलीचा षटकार; जीएसटी सलग सहाव्यांना १ लाख कोटींच्या पारजीएसटीतून मिळणारा महसूल सलग सहाव्यांदा १ लाख कोटींच्या पुढे गेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटातून उभारी घेत असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी, प्राप्तिकर आणि सीमा शुल्क यांच्याकडे असणाऱ्या माहितीचा वापर प्रभावीपणे केला जात आहे. त्यामुळे बोगस बिलं तयार करणाऱ्यांना जोरदार झटका बसला असून महसुलात वाढ झाली आहे.

टॅग्स :जीएसटी