Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारला मोठा दिलासा! GST तून बक्कळ कमाई; जुलै महिन्यात विक्रमी कर संकलन

मोदी सरकारला मोठा दिलासा! GST तून बक्कळ कमाई; जुलै महिन्यात विक्रमी कर संकलन

जुलै महिन्यात GST महसुलात प्रचंड वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 03:43 PM2021-08-01T15:43:39+5:302021-08-01T15:44:10+5:30

जुलै महिन्यात GST महसुलात प्रचंड वाढ झाली आहे.

gst revenue collection rise up to 33 percent in july at rs 116 lakh crore | मोदी सरकारला मोठा दिलासा! GST तून बक्कळ कमाई; जुलै महिन्यात विक्रमी कर संकलन

मोदी सरकारला मोठा दिलासा! GST तून बक्कळ कमाई; जुलै महिन्यात विक्रमी कर संकलन

नवी दिल्ली: कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावलेली असताना एका सकारात्मक बातमी आहे. जुलै महिन्यात कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरल्याचे पाहायला मिळाले. याचा फायदा अर्थव्यवस्थेला झाला असून, जुलै महिन्यात GST महसुलात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर संकलनात ३३ टक्के वाढ झाली आहे. (gst revenue collection rise up to 33 percent in july at rs 116 lakh crore)

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही झाल्याचे दिसून आले. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने महाराष्ट्रासह काही राज्यांनी लॉकडाऊन, कर्फ्यू अशा प्रकारचे निर्बंध घातले होते. त्यामुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय, दुकाने बंद राहिली. परिणामी वस्तू आणि सेवा कर संकलनही कमी झाले. मात्र, जुलै महिन्यात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसून आल्यानंतर राज्यांनी निर्बंधांमध्ये शिथिलता आणली. याचा सकारात्मक परिणाम अर्थचक्रावर होऊन जुलै महिन्यात विक्रमी GST संकलन झाल्याचे सांगितले जात आहे. 

मालामाल! इंधनदरवाढीमुळे ‘या’ कंपनीची भन्नाट कमाई; तब्बल ५ हजार ९४१ कोटींचा नफा

जुलै महिन्यात जीएसटीमधून १,१६,३९३ कोटींचा महसूल

अर्थ मंत्रालयाकडून GST ची आकडेवारी रविवारी जाहीर करण्यात आली. जुलै महिन्यात जीएसटीमधून १,१६,३९३ कोटींचा महसूल मिळाला आहे. यात सीजीएसटी २२,१९७ कोटी, एसजीएसटी २८,५४१ कोटी आणि आयजीएसटी ५७,८६४ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या २७,९०० कोटी रुपयांसह) आणि उपकर ७९१० कोटी रुपये (वस्तुंच्या आयातीवर वसूली झालेल्या ८१५ कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे.

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ एकाच दिवशी ४ कंपन्यांचे IPO सादर होणार; पाहा, डिटेल्स

दरम्यान, जीएसटी महसूल सलग आठ महीने एक लाख कोटी रुपयांवर राहिला होता. जून महिन्यात GST तून सरकारला ९२,८४९ कोटींचा महसूल मिळाला होता. मे महिन्यापाठोपाठ जूनमध्ये कर महसूल कमी झाल्याने सरकारची चिंता वाढली होती. मे महिन्यात १.०२ लाख कोटींचा कर मिळाला होता. जून २०२१ मध्ये तो १ लाख कोटी रुपयांच्या खाली आला. मे २०२१ महिन्यातील ई-वे बिल डेटा पाहिला असता एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ई-वे बिल ३० टक्क्यांहून कमी आहेत. त्याचा फटका GST संकलनाला बसला असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Web Title: gst revenue collection rise up to 33 percent in july at rs 116 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.