नवी दिल्ली : घरगुती आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाºया गोदरेज अप्लायन्सेस, पॅनासोनिक, फिलिप्स लायटिंग आणि इंटेक्स यासारख्या कंपन्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात कर कपातीने उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.
घरगुती कंपन्यांना स्थानिक स्तरावर उत्पादन वाढविण्याकरिता प्रोत्साहन द्यावे आणि आयातीवर सीमाशुल्क वाढवावे. गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख कमल नंदी यांनी सांगितले की, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसी यासारखी उपकरणे आता सामान्यांची गरज झाली आहे. या प्रकारच्या उपकरणांची खरेदी आता अत्यंत सुलभ होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही उत्पादने २८ टक्क्यांऐवजी १८ टक्क्यांच्या टप्प्यात आणावी. विजेची बचत करणाºया पंचतारांकित आणि चार तारांकित उत्पादनांचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करावा, या उद्देशाने उत्पादनांवरील कर सरकार कमी करेल अशी अपेक्षा आहे.
पॅनासोनिकला अशा प्रकारच्या उत्पादनांवर सीमाशुल्क वाढविण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या उत्पादनांचा उपयोग घरगुती बाजारात जास्त होईल, असे कंपनीचे मत आहे.
घरगुती उत्पादनांवर जीएसटी १८ टक्के असावा
घरगुती आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाºया गोदरेज अप्लायन्सेस, पॅनासोनिक, फिलिप्स लायटिंग आणि इंटेक्स यासारख्या कंपन्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात कर कपातीने उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 03:36 AM2018-01-27T03:36:59+5:302018-01-27T03:37:08+5:30