Join us  

यापुढे दरमहा GST ची आकडेवारी जाहीर होणार नाही, सरकारनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 4:21 PM

आता सरकारने यापुढे ही आकडेवारी जाहीर करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी कोणतेही कारण सरकारकडून देण्यात आलेले नाही.

देशात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन किती झाले, याची मासिक आकडेवारी यापुढे जाहीर न करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. जीएसटी व्यवस्था लागू झाल्यापासून दर महिन्याला सरकारकडून कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली जात होती.

१ जुलै २०१७ रोजी देशात जीएसटी व्यवस्था लागू झाली होती. १७ कर आणि १३ उपकर रद्द करून एकच एक कर जीएसटी रूपाने देशात लागू करण्यात आला. जीएसटी व्यवस्थेला आता ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील ७४ महिन्यांपासून प्रत्येक महिन्याला जीएसटीची संकलनाची आकडेवारी सरकारकडून जाहीर केली जात होती. मात्र, आता सरकारने यापुढे ही आकडेवारी जाहीर करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी कोणतेही कारण सरकारकडून देण्यात आलेले नाही.

अंमलबजावणी सुरु...

या निर्णयाची अंमलबजावणी लगेच सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, जून २०२४च्या जीएसटी संकलनाची अधिकृत आकडेवारी सरकारने जाहीर केली नाही. तथापि, काही माध्यमांनी जून २०२४ मध्ये १.७४ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले असल्याच्या बातम्या दिल्या आहेत. मागच्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत हा आकडा सुमारे ८ टक्के अधिक आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :जीएसटी