Join us

‘जीएसटी’चे होणार पाच ऐवजी तीन टप्पे, मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचे सूताेवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 9:24 AM

GST: वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण सरकारच्या अजेंड्यावर आहे. त्यावर निश्चितपणे लवकरच निर्णय घेण्यता येईल, असे सुताेवाच मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी केले. ‘जीएसटी’च्या तीन दर टप्प्यांचे त्यांनी समर्थन केले.

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण सरकारच्या अजेंड्यावर आहे. त्यावर निश्चितपणे लवकरच निर्णय घेण्यता येईल, असे सुताेवाच मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी केले. ‘जीएसटी’च्या तीन दर टप्प्यांचे त्यांनी समर्थन केले.‘असाेचेम’तर्फे आयाेजित ऑनलाइन  चर्चासत्रात ते बाेलत हाेते. सुब्रमणियन यांनी तीन टप्प्यांच्या दर रचनेचे समर्थन केले. ते म्हणाले, की ही रचना खूप महत्त्वाची आहे. तसेच व्यस्त शुल्क रचनेची गुंतागुंतही लवकरच साेडविणे आवश्यक आहे. सध्या देशात जीएसटीचे ०.२५ टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे वेगवेगळे पाच दर प्रकार असून, त्याऐवजी तीनच दर हवे, असे सुब्रमणियन म्हणाले. मुळात तीन टप्प्यांची दर रचनेची याेजना हाेती. मात्र, सध्याची पाच टप्प्यांची दर रचना ही उत्कृष्टच असून सध्या गोळा होत असलेला महसूल त्याची परिणामकारकता दर्शविताे.  

बँकिंग क्षेत्र बरेच मागेभारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वांत माेठी अर्थव्यवस्था आहे. मात्र, देशातील बँकिंग क्षेत्रात भरपूर काम करावे लागणार आहे. काही बँका देशात खूप माेठ्या आहेत. मात्र, जागतिक पातळीवर त्यांचा तेवढा विस्तार नाही. जगातील पहिल्या ५० बँकांमध्ये एकही बँक नाही. ‘एसबीआय’चा या यादीत ५५ वा क्रमांक लागताे. याउलट चीनच्या १८ आणि अमेरिकेच्या १२ बँकांचा या यादीत समावेश असल्याकडे सुब्रमणियन यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :जीएसटीकेंद्र सरकार