Join us

‘जीएसटी’मुळे म्युच्युअल कंपन्यांचे खर्चाचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढणार

By admin | Published: May 26, 2017 1:40 AM

स्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत सेवा करात ३ टक्के वाढ होणार आहे. याचा परिणाम म्हणून म्युच्युअल फंड कंपन्यांचे व्यय प्रमाण (एक्सपेन्स रेशो) ३ टक्क्याने वाढणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत सेवा करात ३ टक्के वाढ होणार आहे. याचा परिणाम म्हणून म्युच्युअल फंड कंपन्यांचे व्यय प्रमाण (एक्सपेन्स रेशो) ३ टक्क्याने वाढणार आहे. म्युच्युअल फंड कंपनीला परिचालनासाठी येणाऱ्या खर्चाला व्यय प्रमाण असे म्हटले जाते. २0 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या छोट्या म्युच्युअल फंड वितरकांना मात्र जीएसटीमुळे फायदा होणार आहे.जीएसटीमध्ये २0 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या म्युच्युअल फंड वितरकांना सेवा करातून सूट देण्यात आली आहे. सध्या १0 लाखांपर्यंत कमिशन मिळविणाऱ्या वितरकांनाच सेवा करातून सूट आहे. पीपीएफएस म्युच्युअल फंड कंपनीचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नील पराग पारिख यांनी सांगितले की, माझ्या कंपनीत डायरेक्ट प्लॅनसाठीचे व्यय प्रमाण १.८ टक्के आहे. नियमित प्लॅनसाठी ते २.३ टक्के आहे. सध्याच्या १५ टक्के सेवाकरानुसार हे व्यय प्रमाण आहे. समजा सेवाकर वाढून १८ टक्के होणार असेल, तर या दोन्ही प्लॅनचे व्यय प्रमाण त्यानुसार वाढेल.तौरस म्युच्युअल फंडचे सीईओ वकार नक्वी यांनी सांगितले की, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर माझ्या कंपनीचे एकूण व्यय प्रमाण वाढणार आहे. २0 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या वितरकांना मात्र जीएसटीचा लाभच होणार आहे. विशेष बाब म्हणजे २0 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या वितरकांची संख्या ८0 टक्के आहे.