Join us  

जीएसटीमुळे त्यांचा होणार २० हजार कोटींचा व्यापार

By admin | Published: June 28, 2017 5:12 PM

जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था, व्यापार उदीम यांच्यावर काय परिणाम होतील, याची सध्या संपूर्ण देशभरात व्यापक प्रमाणात चर्चा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था, व्यापार उदीम यांच्यावर काय परिणाम होतील, याची सध्या संपूर्ण देशभरात व्यापक प्रमाणात चर्चा सुरू आहेत. मात्र टॅक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी जीएसटी सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या व्यापाराची संधी घेऊन आला आहे. तंत्रज्ञान आणि टॅक्सशी संबंधित असलेल्या काही कंपन्या आता जीएसपी अर्थात जीएसटीसंबंधी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार या कंपन्या व्यापारी आणि कंपन्यांना जीएसटीच्या संकेतस्थळावर नोंदणी, इलेक्ट्रॉनिक इनव्हाइस आणि फाइल अपलोडिंग याबाबत मदत करणार आहेत.
पेवर्ल्डसोबत ऑनलाइन पेमेंटच्या व्यापारात उतरण्यापूर्वी सुगल आणि दमानी ग्रुप गेल्या दशकभरापासून लॉटरीचा व्यवसाय करत होते. परंतु आता त्यांनी जीएसटीसंबंधी सेवा पुरवण्याच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यानुसार या संस्था आता जीएसटीच्या संकेतस्थळांवर नोंदणी करण्यापासून ते फाइल अपलोड करण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत व्यापाऱ्यांना करणार आहेत. त्यासोबतच व्यवसाय विस्ताराची संधी म्हणून आपला विस्तार वाढवण्याचा विचारही हे ग्रुप करत आहेत. 
( जीएसटीमुळे पारदर्शकता शक्य )
( देशातील व्यापाऱ्यांनी जीएसटी विधेयक स्वीकारावे )
 
 
 तर पुण्यातील व्याना नेटवर्क लघु आणि मध्यम उद्योगांसोबत निधी जमवण्याचे काम करत असे. त्यांच्याकडे करप्रणाली संबंधी कामाचा कोणताही अनुभव नव्हता.मात्र तरीही व्याना नेटवर्क आता जीएसपी बनले असून, कंपन्या आणि त्यांच्या वितरकांसोबतच छोट्या आणि मध्यम उद्योगांकडून काम मिळवण्यासाठा प्रयत्नशील आहे.  
जीएसटीमुळे जीएसटी सर्व्हिस प्रोव्हायडरसोबतच  अॅप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर (एएसपी) सारख्या सेवांचीही सुरुवात झाली आहे. या सेवा करदात्यांकडून प्राप्त झालेले खरेदी विक्रीचे आकडे ऑनलाइन फायलिंग करण्यासाठी जीएसटी रिटर्नच्या रूपात वापरू शकतील. एकंदरीत जीएसटीमुळे २ ते ३ अब्ज डॉलर सुमारे १३ ते २० हजार कोटी रुपयांचा नवा उद्योग उभा राहत आहे. त्यात सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हायडरपासून एएसपी, जीएसपी, सीए, आणि सल्लागार संस्थांचा समावेश आहे.