Join us  

सप्टेंबरपर्यंत करता येईल जीएसटीच्या ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’चा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 6:29 AM

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीचे पहिलेच वर्ष असल्यामुळे करदाते जीएसटीच्या तरतुदींशी परिचित नव्हते. त्याचप्रमाणे, या वर्षभरात जीएसटीमध्ये खूप बदल झाले. या सर्व गोंधळात जर करदात्याकडून चुकून आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) क्लेम करायचे राहिले असेल, तर काय करावे ?

कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, जीएसटी कायद्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटच्या कलमांमध्ये अनक्लेम्ड आयटीसी घेण्याची तरतूद दिलेली आहे. सीजीएसटी कायद्याच्या कलम १६ (४) नुसार, नोंदणीकृत व्यक्ती वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीच्या पुरवठ्याचे टॅक्स इन्व्हॉइस किंवा डेबिट नोट यांच्या संदर्भातील आयटीसी, हे ते टॅक्स इन्व्हॉइस किंवा डेबिट नोट ज्याच्याशी संबंधित आहते. त्या आर्थिक वर्षाच्या पुढील वर्षातील सप्टेंबर महिन्याचे कलम ३९ अंतर्गत दाखल करण्यात येणाऱ्या रिटर्नची देय तारीख किंवा संबंधित वार्षिक रिटर्न दाखल करण्याची देय तारीख, यापैकी जे आधी असेल, त्या कालावधीनंतर घेऊ शकत नाही.अर्जुन : कृष्णा, या तरतुदीचा अर्थ नेमका काय होतो?

कृष्ण : अर्जुना, या कलमात असे सांगितलेले आहे की, करदात्याकडून चुकून एखाद्या बिलावरील आयटीसी क्लेम करायचे राहिले असेल, तर करदाता पुढील वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या रिटर्नपर्यंत म्हणजे २० आॅक्टोबर किंवा वार्षिक रिटर्न म्हणजे ३१ डिसेंबर यामध्ये जे आधी असेल, तोपर्यंत सप्टेंबरचे किंवा त्या आधीचे रिटर्न यामध्ये क्लेम करू शकतो. उदा. ‘अ’ ने ‘ब’ कडून डिसेंबर २०१७ मध्ये खरेदी केली व चुकून त्याचे आयटीसी क्लेम करायचे राहिले, तर ‘अ’ तो अनक्लेम्ड आयटीसी सप्टेंबर, २०१८च्या अगोदर कोणत्याही रिटर्नमध्ये क्लेम करू शकतो.अर्जुन : कृष्णा, जर करदात्याने सप्टेंबर महिन्याच्या रिटर्नपर्यंत अनक्लेम्ड् आयटीसी घेतले नाही तर काय होईल ?कृष्ण : अजुर्ना, जर जूलै, २०१७ ते मार्च, २०१८ मधील खरेदीचे अनक्लेम्ड् आयटीसी करदात्याने आता घेतले नाही तर ते तसेच राहून जाईल. सप्टेंबर, २०१८ च्या रिटर्ननंतर या वर्षातील एखाद्या बिलाचे अनक्लेम्ड् आयटीसी कधीच क्लेम करता येणार नाहीत.अर्जुन : कृष्णा, करदात्याने अनक्लेम्ड् आयटीसी सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या रिटर्न मध्ये क्लेम करण्यासाठी काय करावे ?कृष्ण : अजुर्ना, करदात्याने त्याचे आर्थिक वर्ष २०१७-१८ चे लेखापुस्तके व रिटर्न्सचे रिकंसिलेशन बनवावे. जीएसटी पोर्टलवरून जीएसटीआर २ ए डाऊनलोड करून त्यातील क्रेडिटची पुस्तकाशी जुळणी करावी. तफावत असल्यास रिटर्नमध्ये समायोजन करावे.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?कृष्ण : अर्जुना, प्रथमदर्शनी कलम १६ (४) ची तरतूद ही चुकीची वाटते. कारण वार्षिक रिटर्न अजूनही आलेले नाही. आर्थिक वर्षात जर आयटीसीमध्ये काही वर-खाली झाले, तर वार्षिक रिटर्नमध्ये त्यासंबंधी बरोबर माहिती दाखल करणे ही योग्य पद्धत आहे. अनक्लेम्ड आयटीसी सप्टेंबर महिन्याच्या रिटर्नमध्ये समायोजित करणे अडचणीचे ठरत आहे. आयटीसीच्या चुका सुधारण्यासाठी अ‍ॅन्युअल रिटर्न म्हणजेच, जीएसटी आॅडिट रिपोर्ट दाखल करेपर्यंंत वेळ दिला पाहिजे.(सी. ए. उमेश शर्मा)

टॅग्स :जीएसटीव्यवसाय