Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीचा सर्व व्यवसायांवर सकारात्मक परिणाम!

जीएसटीचा सर्व व्यवसायांवर सकारात्मक परिणाम!

वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) एकूणच व्यवसायांवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मत एका सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांच्या बहुतांश मुख्य वित्त अधिकाऱ्यांनी (सीएफओ) व्यक्त केले आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 03:03 AM2018-06-30T03:03:31+5:302018-06-30T03:03:34+5:30

वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) एकूणच व्यवसायांवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मत एका सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांच्या बहुतांश मुख्य वित्त अधिकाऱ्यांनी (सीएफओ) व्यक्त केले आहे

GST's positive impact on all businesses! | जीएसटीचा सर्व व्यवसायांवर सकारात्मक परिणाम!

जीएसटीचा सर्व व्यवसायांवर सकारात्मक परिणाम!

नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) एकूणच व्यवसायांवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मत एका सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांच्या बहुतांश मुख्य वित्त अधिकाऱ्यांनी (सीएफओ) व्यक्त केले आहे. कंपन्यांच्या खेळत्या भांडवलावर मात्र, जीएसटीचा प्रतिकूल परिणाम झाल्याने सीएफओंनी म्हटले आहे.
जीएसटीच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवा संस्था डेलॉइटने हे सर्वेक्षण केले आहे. ‘डेलॉइट इंडिया सीएफओ सर्व्हे २०१८’ या नावाने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात विविध कंपन्यांचे २५० सीएफओ सहभागी झाले होते. २५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांपासून १० हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांपर्यंतच्या सर्व स्तरातील कंपन्यांच्या सीएफओंचा त्यात समावेश होता. सूचीबद्ध आणि असूचीबद्ध, तसेच खासगी आणि सरकारी अशा सर्व प्रकारांतील कंपन्यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले.
सर्वेक्षण अहवालानुसार, जीएसटीचा सकारात्मक परिणाम झाला, असे मत ७७ टक्के
सीएफओंनी व्यक्त केले असून, ७१ टक्के उत्तरदात्यांनी म्हटले की,
जीएसटीचा महसुलावर सकारात्मक परिणाम झाला आहे, तसेच ७० टक्के उत्तरदात्यांनी पुरवठा साखळी सुधारल्याचे, तर ५८ टक्के उत्तरदात्यांनी व्यवसाय करणे अधिक सुलभ झाल्याचे मान्य केले.

Web Title: GST's positive impact on all businesses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.