Join us  

अदानी सुस्साट! फोर्ब्सच्या 'या' यादीत पटकावलं अव्वल स्थान, मस्क अन् अंबानींनाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 10:54 AM

अमेरिकन रिसर्च फाऊंडेशन हिंडनबर्गच्या अहवालानंतर कोसळलेल्या अदानी समूहानं आता दमदार कमबॅक केलं आहे.

नवी दिल्ली-

अमेरिकन रिसर्च फाऊंडेशन हिंडनबर्गच्या अहवालानंतर कोसळलेल्या अदानी समूहानं आता दमदार कमबॅक केलं आहे. सातत्यानं पडझड सुरू असणाऱ्या अदानी ग्रूपनं आता उभारी घेण्यास सुरुवात केली आहे. फोर्ब्सच्या विनर लिस्टमध्ये अदानींनी आज अव्वल स्थान गाठलं आहे. 

हिंडेनबर्गनं आपल्या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप केले. खात्यांमध्ये हेराफेरी, कंपनीतील गडबड, शेअर्सची कमी किंमत असे अनेक गंभीर आरोप अदानी समूहावर करण्यात आले. या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरत राहिले. कंपनीचा मार्केट कॅप १० दिवसांत तब्बल १०० अब्ज डॉलरपर्यंत घसरला. खुद्द गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट नोंदवण्यात आली. २०२३ च्या सुरुवातीच्या आठवड्यात त्यांची संपत्ती १३० अब्ज डॉलरच्या वर होती, पण या अहवालामुळे त्यांना मोठा धक्का बसला. १० दिवसांत त्यांची संपत्ती थेट ५८ अब्ज डॉलरवर येऊन ठेपली. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत अदानी २ व्या क्रमांकावरून २२ व्या क्रमांकावर घसरले, पण अदानींनी आता पुनरागमन केलं आहे. अदानी ग्रूप आता शेअर बाजारात चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. बुधवारी अदानींनी फोर्ब्सच्या विनर लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.

फोर्ब्सच्या विनर लिस्टमध्ये टॉपरफोर्ब्सच्या बुधवारच्या यादीत गौतम अदानी टॉप गेनर होते, या वेबसाइटने त्यांच्या संपत्तीच्या आधारे जगातील श्रीमंतांची रँकिंग केली होती. काल गौतम अदानी यांनी जगभरात सर्वाधिक कमाई केली. एका दिवसात त्यांच्या खात्यात सर्वाधिक संपत्ती जमा झाली. बुधवारी गौतम अदानी यांनी २४ तासांत ४.३ अब्ज डॉलरची कमाई केली. त्याची एकूण संपत्ती ४.३ अब्ज डॉलरनं वाढली आणि त्याची एकूण संपत्ती आता ६४.९ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक गेनच्या यादीत अदानींनंतर इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर Klaus-Michael Kuehne तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

काल त्याची संपत्ती १.९ अब्ज डॉलरने वाढली. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी चौथ्या क्रमांकावर होते. त्यांची संपत्ती काल एका दिवसात १.६ अब्ज डॉलरने वाढली. फोर्ब्सच्या या यादीनुसार काल लॅरी पेजने सर्वाधिक संपत्ती गमावली. काल एका झटक्यात त्यांनी या कंपनीनं ६.४ अब्ज डॉलर गमावले.

टॅग्स :गौतम अदानीअदानी