Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुढीपाडव्याला मुंबईत ३२५ कोटींची सोने खरेदी, गृह खरेदी जोरदार

गुढीपाडव्याला मुंबईत ३२५ कोटींची सोने खरेदी, गृह खरेदी जोरदार

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याला सराफ बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा फोल ठरली. सोन्याच्या चढ्या दरामुळे केवळ ३२५ कोटींची उलाढाल झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:29 AM2018-03-19T05:29:17+5:302018-03-19T05:29:17+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याला सराफ बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा फोल ठरली. सोन्याच्या चढ्या दरामुळे केवळ ३२५ कोटींची उलाढाल झाली.

Gudi Padva receives 325 crores gold in Mumbai, buying home | गुढीपाडव्याला मुंबईत ३२५ कोटींची सोने खरेदी, गृह खरेदी जोरदार

गुढीपाडव्याला मुंबईत ३२५ कोटींची सोने खरेदी, गृह खरेदी जोरदार

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याला सराफ बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा फोल ठरली. सोन्याच्या चढ्या दरामुळे केवळ ३२५ कोटींची उलाढाल झाली. सोन्याची नाणी आणि लहान दागिण्यांचा खरेदीमध्ये समावेश होता. सराफ बाजारात रोज २०० ते २५० कोटी रूपयांची उलाढाल होते. रविवारी ३५० ते ४०० कोटी रूपयांचा व्यवसाय होईल, अशी आशा होती. परंतु मोठी उलाढाल झाली नाही. मागील वर्षी दिवाळीत सराफ बाजाराने ४०० कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला होता. अक्षय तृतीयेला चांगला व्यापार होईल, असे मुंबई ज्वेलर्स असोशिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले.
अक्षय तृतीयेला सोन्याचे दर कमी होतील, असा अंदाज आहे. गृह खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. नोटबंदी, जीएसटीचा काही परिणाम झाला होता, तो आता ओसरला असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
>जळगावला १० कोटींची उलाढाल
जळगावला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. नेहमीपेक्षा सोन्याला तीनपट मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आकर्षक कलाकुसरीचे दागिने, मणी-मंगळसूत्र, अंगठी, पाटल्या, कर्णफुले यांना चांगली मागणी होती. रविवार असूनही साधारण १० कोटींची उलाढाल झाली असावी, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला. जळगावात सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ३०,४५० रुपये असा होता.
गुढीपाडवा आणि नववर्षांच्या मुहुर्तावर घर खरेदीला चांगला प्रतिसाद होता. दोन वर्षांपासून थंडावलेल्या व्यवसायाला उभारी मिळाली आहे.
- आनंद गुप्ता, सदस्य,
बिल्डर्स असोशिएशन
आॅफ इंडिया

Web Title: Gudi Padva receives 325 crores gold in Mumbai, buying home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं