Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्हॅनद्वारे घरपोच मिळतेय सळईबाबत मार्गदर्शन

व्हॅनद्वारे घरपोच मिळतेय सळईबाबत मार्गदर्शन

सळई उत्पादनात राज्यासह देशभरात अग्रेसर असलेल्या राजुरी स्टील लि. कंपनीकडून बांधकाम दर्जेदार तसेच टिकाऊ व्हावे यासाठी कोणत्या सळईचा वापर करावा

By admin | Published: June 27, 2016 03:27 AM2016-06-27T03:27:17+5:302016-06-27T03:27:17+5:30

सळई उत्पादनात राज्यासह देशभरात अग्रेसर असलेल्या राजुरी स्टील लि. कंपनीकडून बांधकाम दर्जेदार तसेच टिकाऊ व्हावे यासाठी कोणत्या सळईचा वापर करावा

Guidance on getting home based on van | व्हॅनद्वारे घरपोच मिळतेय सळईबाबत मार्गदर्शन

व्हॅनद्वारे घरपोच मिळतेय सळईबाबत मार्गदर्शन


जालना : सळई उत्पादनात राज्यासह देशभरात अग्रेसर असलेल्या राजुरी स्टील लि. कंपनीकडून बांधकाम दर्जेदार तसेच टिकाऊ व्हावे यासाठी कोणत्या सळईचा वापर करावा, याचे मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज व हायटेक अशी ६ व्हॅन तयार करण्यात आल्या आहे. ही व्हॅन महाराष्ट्रातील प्रत्येग गावात जाऊन
मार्गदर्शन करणार तसेच दर्जेदार सळईबाबत तज्ज्ञांद्वारे जनजागृती करणार आहे.
आज ४० टक्क्यांपेक्षा जास्त बनावट तसेच सुजार दर्जाची टीएमटी सळई बाजारात विक्री केले जाते. या सळईमुळे बांधकामात दोष येऊन इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी कोणती सळई दर्जेदार आहे, त्याचे निकष काय असावेत, तांत्रिक बाबी कशा ओळखाव्यात व ग्राहकहित लक्षात घेऊन या व्हॅन तयार करण्यात आल्याची माहिती राजुरी स्टीच्या संचालकांनी दिली. ही व्हॅन हायटेक असून, यात मिटिंग कक्षापासून प्रयोगशाळाही आहे.
दहा जणांना एकाच वेळी मार्गदर्शन करता येणार आहे. या व्हॅन थेट बांधकाम साईडवर जाऊन मार्गदर्शन करणार आहे. तसेच मिस्त्री लोकांनाही तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल. साईडवरील बांधकामदारांचे म्हणणे तसेच त्याला कोणत्या दर्जाच्या स्टीलची गरज आहे,
हे लक्षात घेऊन परिपूर्ण मार्गदर्शन केले जात आहे. व्हॅनमधील टीव्हीद्वारेही माहिती देण्यात येणार आहे.
व्हॅनमधील मिनी प्रयोगशाळा
व्हॅनमधील प्रयोगशाळेत सळईची तपासणी करून गुणवत्ता बांधकामदाराला दाखवून देण्यात येणार आहे. यात स्पेक्ट्रो मीटरसह केमिकल तपासणी करण्यात येणार आहे.
रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या राजुरी स्टीलने ग्राहक हितासाठी आणि गुणवत्ता व दर्जा कायम राहावा यादृष्टिने सतत प्रयत्न केले आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती हा त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमामुळे बांधकाम व्यवसायिकांसह ग्राहकांमध्येही कमालीची जागृती होत आहे.
प्रत्यक्ष बांधकामस्थळी व्हॅनद्वारे सळईच्या गुणवत्तेबाबत बांधकाम मिस्त्री व बांधकाम मालक यांना माहिती दिली जाणार आहे.
२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राजुरी स्टीलच्या
वतीने ही जनजागृती करण्यात येत आहे. या व्हॅन छोट्या छोट्या गावात जाऊन बांधकामदार, मिस्त्री तसेच अभियंत्यांशी संवाद साधून जनजागृती करणार आहे.

Web Title: Guidance on getting home based on van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.