Join us

आर्थिक सल्ले देणाऱ्या influencers वर सरकारची नजर; डिग्री अन् SEBI रजिस्ट्रेशन गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 8:43 PM

Guidelines for Finfluencers: सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्यांसाठी ASCI ने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

Guidelines for Finfluencers: Finfluencers म्हणजेच सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्या इंफ्लुएंसर्ससाठी मोठी बातमी आहे. गेल्या काही काळापासून ASCI (Advertising standard counsel of India) मार्केट रेगुलेटर SEBI सोबत मिळून इंफ्लुएंसर्सच्या कंटेटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याबाबत सातत्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येत आहेत. आता ASCI ने यासाठी काही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

अर्थ विषयक माहिती नसताना इंटरनेटद्वारे लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देणे, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून खात्रीशीर परताव्याची हमी देणे किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या Finfluencers वर सरकार पाळत ठेवून आहे. फसवणूक करणाऱ्या Finfluencers वर कारवाई करण्यासाठी ASCI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत.

काय आहेत ASCI च्या नवीन गाइडलाइन्स1. जर influencer BFSI space म्हणजेच Banking, Financial services आणि Insurance शी संबंधित कंटेंट बनवत आहे, तर त्याच्याकडे तसा कंटेंट बनवण्याची परवानगी असायला हवी.

2. जर एखादा इंफ्लुएंसर स्टॉक मार्केट किंवा इतर गुंतवणूकीचा सल्ला देत असेल, तर त्याच्याकडे SEBI registration नंबर असायला हवा आणि तो नंबर त्याचे नाव आणि qualifications मध्ये दिसायला हवा.

3. Finance संबंधित माहिती देत असेल, तर त्याच्याकडे तशाप्रकारचे(CA, CS इत्यादी.) शिक्षण घेतलेले असायला हवे.

4. जर कुणी इंशुंरन्स पॉलिसी विकत असेल, तर त्याच्याकडे IRDAI चा परवाना असायला हवा.

5. कंटेंटमध्ये रिस्कचे full disclosure असायला हवे, जे financial regulators ने आधीच ठरवलेले आहे.

6. पेड कंटेट असेल, तर AD किंवा advertisement शब्दाचा वापर करणे गरजेचे आहे.  

टॅग्स :सेबीसोशल मीडियाअर्थव्यवस्थाशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक