Join us

गुजरात बनले उत्पादन क्षेत्राचे नवे हब, महाराष्ट्राला मागे टाकून मारली मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 9:13 AM

Business: महाराष्ट्राला मागे टाकून गुजरातने उत्पादन क्षेत्रात मुसंडी मारली आहे. उत्पादन क्षेत्राचे नवे हब म्हणून गुजरात उदयास येत आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये गुजरातने उत्पादन क्षेत्रात १५.९ टक्के एवढी वाढ नाेंदविली

नवी दिल्ली : महाराष्ट्राला मागे टाकून गुजरातने उत्पादन क्षेत्रात मुसंडी मारली आहे. उत्पादन क्षेत्राचे नवे हब म्हणून गुजरात उदयास येत आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये गुजरातने उत्पादन क्षेत्रात १५.९ टक्के एवढी वाढ नाेंदविली असून, महाराष्ट्रात ७.५ टक्के वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती आढळून आली आहे.आर्थिक वर्ष २०१२ ते २०२० या कालावधीत गुजरातने सरासरी ५.११ लाख काेटी रुपयांची वाढ नाेंदविली आहे. गुजरातची उत्पादन क्षेत्रात ग्राॅस व्हॅल्यू ॲडिशन दरवर्षी सरासरी १५.९ टक्के राहिली. महाराष्ट्रात हाच आकडा ७.५ टक्के असून, दरवर्षी ४.३४ लाख काेटी रुपयांची वाढ नाेंदविली आहे. 

कशामुळे गुजरात आघाडीवर?गुजरातमध्ये २०१२ आणि २०१९ या कालावधीत ५.८५ लाख काेटी रुपयांची, तर महाराष्ट्रात ४.०७ लाख काेटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गुजरात सरकारने उद्याेगाभिमुख धाेरण राबविल्याचे अहवालात म्हटले आहे.सेवा क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवरमहाराष्ट्राने सेवा क्षेत्रातील आघाडीचे स्थान कायम राखले आहे. हे क्षेत्र गेल्या आर्थिक वर्षात १५ लाख काेटी रुपये अर्थात १२.६ टक्क्यांनी वाढले आहे.  कर्नाटकने ९.७२ लाख काेटी रुपयांची वाढ नाेंदवून दुसरे स्थान प्राप्त केले आहे.

टॅग्स :व्यवसायगुजरातमहाराष्ट्र