सबंधित फोटो घेता येईल ...गुटखा बंदी कायद्यात पळवाटा- चक्क शाळेसमोर विक्री : जुजबी स्वरूपाची कारवाईनागपूर : वर्षाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतानाही भावी पिढीचा विचार करून राज्य सरकारने गुटख्यावर संपूर्ण बंदी घातली. मात्र, आजही लपूनछपून आणि दुप्पट दराने गुटखा विकला जात असल्याची माहिती आहे. राज्य शासनाने गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी व खर्रा आणि तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध लावणारा अध्यादेश १९ जुलै २०१४ रोजी सलग तिसऱ्यांदा काढला. विभागातर्फे कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी लोकमतशी बोलताना दिली. पण ही कारवाई जुजबी स्वरूपाची असल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. आता विक्री लपूनछपूनगुटख्याच्या विक्रीत काहीच घट झालेली नाही. आधी खुल्यावर विक्री व्हायची आता त्यापेक्षा जास्त लपूनछपून होत आहे. महिन्यात दोन-चार कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी प्रसिद्धीपत्रक काढण्याचा छंद अन्न प्रशासन विभागाने आता सोडून द्यावा, अशी आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. गुटखा बंदी सध्या तरी कागदोपत्रीच दिसत आहे. एरवी कारवाईसाठी अग्रेसर असलेले पोलीस प्रशासन या कारवाईत मागे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. किराणा मालाची दुकाने, पानटपऱ्या, बसस्थानक परिसरातील पानटपऱ्या, हॉटेल आदींमधून ही गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. कुणालाच प्रशासनाचा धाक राहिलेला नाही, हे यावरून दिसून येते.राजरोस मिळतो गुटखाकाही विक्रेते प्रामुख्याने मोजक्या व प्रचलित कंपन्यांचा गुटखा विकतात. गुटख्याची पुडी कंपनीच्या किमतीपेक्षा अधिक दराने विकली जात आहे. दोन-ते तीन रुपयांची गुटखा पुडी सात ते दहा रुपयांना विकली जाते. विक्री करणारे गुटख्याचा साठा अन्य ठिकाणी करतात. अनेक ठिकाणी दक्षता म्हणून फक्त ओळखीच्या व्यक्तीलाच गुटखा दिला जातो, तर काही ठिकाणी कोणीही गुटख्याची मागणी केल्यास तो मिळतो. त्यामुळे राजरोसपणे गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. अन्न प्रशासन विभागातर्फे गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ती जुजबी स्वरूपाची ठरत आहे. मुख्य सूत्रधारांवर कारवाई कधी होणार, हा खरा प्रश्न आहे.
गुटखा बंदी ...१ ...
संबंधित फोटो घेता येईल ...
By admin | Published: February 16, 2015 09:12 PM2015-02-16T21:12:08+5:302015-02-16T21:12:08+5:30