गुटखा बंदी ...२ ...
By admin | Published: February 16, 2015 9:12 PM
शाळांसमोर सर्रास विक्री राज्यात गुटखाबंदी सुरू झाली असली, तरी सर्रास विक्री सुरू आहे. १८ वर्षांखालील कोणालाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असे न्यायालयाचे आदेश असताना गुटख्याची सर्वत्र विक्री होत आहे. काही दिवसांआधी अन्न प्रशासन विभागाने जवळपास १२ शाळांसमोरील पानटपरीवर धाडी टाकून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा गुटखा जप्त केला. गुटखा विक्रीसाठी शाळकरी मुलांना लक्ष्य केले जात असल्याचे यावरून दिसून येते. ही गंभीर बाब आहे. गुटखा विक्रीसंबंधी पोलिस यंत्रणा गप्प असल्याचे स्पष्ट होते. हा माल येतो कुठून?साधारणत: सीमेलगतच्या राज्यातून हा गुटखा आणला जातो. काही गुटखा विक्रेत्यांनी शासनाच्या गुटखा बंदीचा लाभ घेत गुटख्याची किंमत वाढविली आहे. गुटखा उत्पादनावर बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा कोठून येतो, असा प्रश्न उपस्थित होतो. गुटखा विक्रीची माहिती असूनही पोलीस यंत्रणा मूग गिळून आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुटखा खाणाऱ्यांना गुटखा विक्रीची ठिकाणे सापडतात, मात्र, पोलिसांना किंवा अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही, हे कोडे कायम आहे.बॉक्स५५ लाखांचा साठा जप्तअन्न प्रशासन विभागाने नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा अशा सहा ठिकाणी ३२७ पेढ्यांची तपासणी करून सुमारे ५६ लाख रुपये किमतीचा ४८७७.८७ किलो प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त केला. विभागाने ही कारवाई १९ जुलै २०१४ या अधिसूचना जारी झालेल्या तारखेपासून ३१ जानेवारी २०१५ पर्यंत केली. त्यात जानेवारीमध्ये १७ ठिकाणी धाडी टाकून १२.३९ लाख रुपये किमतीचा १४८४ किलो सुगंधित तंबाखू जप्त केला. याशिवाय कमी दर्जाचे अन्न पदार्थ व अस्वच्छ आणि अनारोग्य अन्न व्यवसाय प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.