Lokmat Money > बिझनेस न्यूज > अबबब...मुंबईतील या व्यक्तीने Swiggy वरुन वर्षभरात ऑर्डर केले 42 लाख रुपयांचे जेवण

अबबब...मुंबईतील या व्यक्तीने Swiggy वरुन वर्षभरात ऑर्डर केले 42 लाख रुपयांचे जेवण

Swiggy ने 2023 ची रिपोर्ट जारी केली, ज्यात ही माहिती देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 08:54 PM2023-12-15T20:54:49+5:302023-12-15T20:55:22+5:30

Swiggy ने 2023 ची रिपोर्ट जारी केली, ज्यात ही माहिती देण्यात आली आहे.

guy from Mumbai ordered food worth Rs 42 lakh from Swiggy | अबबब...मुंबईतील या व्यक्तीने Swiggy वरुन वर्षभरात ऑर्डर केले 42 लाख रुपयांचे जेवण

अबबब...मुंबईतील या व्यक्तीने Swiggy वरुन वर्षभरात ऑर्डर केले 42 लाख रुपयांचे जेवण

Swiggy: येत्या काही दिवसांत 2023 संपणार आहे, त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या वार्षिक रिपोर्ट जाहीर करत आहेत. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy नेही त्यांची रिपोर्ट जाहीर केली असून, यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. स्विगीने जारी केलेल्या यादीमध्ये 2023 मध्ये सर्वाधिक पसंती मिळालेली डिश आणि ज्या लोकांनी सर्वाधिक ऑर्डर दिल्या, त्याबद्दल सांगितले आहे. मुंबईतील एक व्यक्ती Swiggy वरुन वर्षभरात तब्बल 40 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे खाद्यपदार्थ ऑर्डर केले.

यंदाही बिर्याणी आवडता पदार्थ 
Swiggy ने 2023 च्या अहवालात 1 जानेवारी 2023 ते 23 नोव्हेंबर पर्यंतचा डेटा जाहीर केला आहे. यावर्षीदेखील बिर्याणीने सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिशमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. स्विगीवर बिर्याणीला सर्वाधिक ऑर्डर मिळाल्याचे हे सलग 8 वे वर्ष आहे. कंपनीच्या अहवालानुसार, 2023 मध्ये भारतीय लोकांनी दर सेकंदाला 2.5 बिर्याणी ऑर्डर केल्या. वर्षाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 1 जानेवारीला 4,30,000 बिर्याणीची ऑर्डर मिळाली होती.

मुंबईतील व्यक्तीने सर्वाधिक खर्च केला
स्विगीने आपल्या एका वेड्या ग्राहकाबद्दलही सांगितले आहे. त्या व्यक्तीने एका वर्षात प्लॅटफॉर्मवर लाखो रुपयांचे खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर केले आहेत. मात्र, त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. स्विगीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, स्विगीवर 1 जानेवारी ते 23 नोव्हेंबर या कालावधीत मुंबईतील एका ग्राहकाने तब्बल 42.3 लाख रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केले.

विश्वचषकादरम्यान प्रचंड मागणी
स्विगीने सांगितले की, नुकत्याच संपलेल्या विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन ऑर्डरची मागणी जास्त होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान सर्वाधिक ऑर्डर देण्यात आल्या. सामन्यादरम्यान प्रति मिनिट 250 पेक्षा जास्त बिर्याणीच्या ऑर्डर मिळाल्या. चंदीगडमधील एका कुटुंबाने एकाच वेळी 70 बिर्याणी ऑर्डर केल्या होत्या.

Web Title: guy from Mumbai ordered food worth Rs 42 lakh from Swiggy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.