Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीमध्ये रिव्हाइज रिटर्न? आसमान से निकले और...

जीएसटीमध्ये रिव्हाइज रिटर्न? आसमान से निकले और...

अर्जुना, जीएसटीचे पहिले वर्ष असल्याने खूप चुका करदाता आणि शासनातर्फे झाल्या आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 03:32 AM2018-06-25T03:32:06+5:302018-06-25T03:32:15+5:30

अर्जुना, जीएसटीचे पहिले वर्ष असल्याने खूप चुका करदाता आणि शासनातर्फे झाल्या आहेत.

GV revive returns? Out of the sky and ... | जीएसटीमध्ये रिव्हाइज रिटर्न? आसमान से निकले और...

जीएसटीमध्ये रिव्हाइज रिटर्न? आसमान से निकले और...

सी. ए. उमेश शर्मा

अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीचे पहिले वर्ष असल्याने खूप चुका करदाता आणि शासनातर्फे झाल्या आहेत. त्यावर रिव्हाइज रिटर्न नसल्याने आणि अ‍ॅन्युअल रिटर्न अजूून उपलब्ध नसल्याने व आता इन्कम टॅक्स रिटर्न भरावयाच्या तारखा येत आहेत. जीएसटी अंतर्गत रिव्हाइज रिटर्नचा पर्याय उपलब्ध नाहीत. सर्व करदात्यांसाठी ही एक अवघड समस्या झालेली आहे. या समस्येवर कधी आणि कसा उपाय निघेल, हे काही सांगता येणार नाही. हिशेब पुस्तके, जीएसटी रिटर्न आणि इनकम टॅक्स रिटर्न यात तफावत येत आहे, त्यामुळे या गोंधळाच्या परिस्थितीत ‘आसमान से निकले और खजूर पे अटके’ अशी त्यांची परिस्थिती उद्भवलेली आहे.


अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमध्ये रिटर्न रिव्हाइज करता येते का ?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, जीएसटीमध्ये रिव्हाइज रिटर्न नावाची कोणतीही संकल्पना नाही. त्यामुळे जीएसटीअंतर्गत एकदा दाखल केलेल्या रिटर्नमध्ये कोणतीही सुधारणा करता येत नाही.
अर्जुन : कृष्णा, जर रिटर्न भरल्यानंतर त्या महिन्याच्या विक्रीमध्ये काही तफावत आली, तर करदात्याने काय करावे?
कृष्ण : अर्जुना, (१) जर करदात्याकडून जीएसटीआर ३बीमध्ये विक्रीचे एखादे इन्व्हाइस टाकायचे राहिले, तर त्याचा तपशील पुढील महिन्याच्या जीएसटीआर ३बीमध्ये जावक पुरवठ्यामध्ये मिसळावा आणि त्यावरील कराचे व्याजासह पेमेंट करावे. त्या महिन्याचे जीएसटीआर १ दाखल झालेले नसेल, तर त्यात योग्य तपशील द्यावा, नाहीतर पुढील महिन्याच्या जीएसटीआर १ मध्ये त्या इन्व्हाइसची माहिती द्यावी. (२) जर करदात्यांकडून जीएसटीआर १ मध्ये विव्रष्ठीचा एखाद्या इन्व्हाइसचा संपूर्ण तपशील टाकायचा राहीला, तर पुढील महिन्याच्या जीएसटीआर १ मध्ये तो संपूर्ण तपशील टाकून द्यावा.
उदा- करदात्याकडून मे महिन्याचे रु. १,००,०००चे (आयजीएसटी रु. १८,०००) एखादे बिल जीएसटीआर ३ बीमध्ये चूकून घ्यायचे राहिले, तर त्याने मे महिन्याच्या जीएसटीआर १ मध्ये त्या बिलाचा संपूर्ण तपशील तर टाकावाच, परंतु त्या बिलाचे करपात्र मूल्य रु. १,००,००० आणि त्यावरील आयजीएसटी रु. १८,००० (व्याजासह) वरील कराचे पेमेंट जून महिन्याच्या जीएसटीआर ३बीमध्ये दाखवावे.
अर्जुन : कृष्णा, खरेदीमध्ये तफावत आढळली, तर काय करावे?
कृष्ण : अर्जुना, जर एखाद्या महिन्यात खरेदी कमी दाखविली, तर पुढील महिन्यात उरलेली खरेदी दाखवून क्रेडिट घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या महिन्यात चुकून खरेदीवरचे क्रेडिट जास्त दाखविले, तर पुढील महिन्यात उपलब्ध क्रेडिटमधून तेवढे क्रेडिट रिव्हर्स करून कमी करता येऊ शकते. त्यावरील व्याजदेखील भरावे लागेल.
उदा : एखाद्या करदात्याकडून एप्रिल महिन्याच्या जीएसटीआर ३बीमध्ये एकूण रु. २०,००० च्या क्रेडिटऐवजी फक्त रु. १५,०००चे क्रेडिट घेतले, तर उरलेले रु.५,००० (२०,०००-१५,०००)चे क्रेडिट मे महिन्याच्या जीएसटीआर ३बीमध्ये घेता येईल.
अर्जुन : कृष्णा, जर जीएसटी अंतर्गत पेमेंट करताना चुकून दुसऱ्या हेडमध्ये पेमेंट केले, तर काय
करावे?
कृष्ण : अर्जुना, जर करदात्याने आयजीएसटीऐवजी चुकून सीजीएसटी/एसजीएसटीमध्ये पेमेंट केले, तर त्याने आयजीएसटीचे चलन बनवून तेवढे पैसे भरावेत आणि चुकून सीजीएसटी/एसजीएसटीमध्ये भरलेल्या रकमेचा फॉर्म आरएफडी ०१ दाखल करून रिफंड घ्यावा, तसेच सीजीएसटी/एसजीएसटीऐवजी आयजीएसटी भरला, तरीही हेच करावे. या प्रकरणात करदात्याला व्याज भरावे लागणार नाही.
उदा : ‘अ’ने रु.१,००० सीजीएसटी आणि रु.१,००० एसजीएसटीऐवजी रु.२,००० आयजीएसटी म्हणून भरले, तर ‘अ’ रु. २,००० आयजीएसटीचा रिफंड घेऊ शकतो आणि त्याला सीजीएसटी व एसजीएसटी प्रत्येकी रु. १००० भरावे लागेल.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीअंतर्गत वार्षिक रिटर्नची संकल्पना काय आहे?
कृष्ण : अर्जुना, प्रत्येक करदात्याला पुढील वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत जीएसटीचे वार्षिक रिटर्न भरणे अनिवार्य आहे. यामध्ये आॅडिट आणि नॉनआॅडिट असे दोन प्रकार असतात. आॅडिट लागू नसलेल्या करदात्यांसाठी फक्त वार्षिक रिटर्न दाखल करणे अनिवार्य असेल, तसेच आॅडिट लागू असलेल्या करदात्यांसाठी वार्र्षिक रिटर्न, आॅडिट रिपोर्ट आणि रिकंसिलेशन दाखल करावे लागेल. यामध्ये शासन खरेदीचे मिस मॅच व इतर तरतुदी कशा प्रकारे लागू करेल, हे देवच जाणे.

Web Title: GV revive returns? Out of the sky and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी