Lokmat Money > बिझनेस न्यूज > एच-वन बी, एल-वन व्हिसा शुल्क अमेरिकेने वाढविले

एच-वन बी, एल-वन व्हिसा शुल्क अमेरिकेने वाढविले

एच-वन बी आणि एल-१ व्हिसावरील काही ठराविक वर्गातील शुल्क अमेरिकेने वाढविले आहे. ही अतिरिक्त वाढ ४ हजार अमेरिकी डॉलरपर्यंत करण्यात आली असून, त्याचा फटका

By admin | Published: January 14, 2016 02:07 AM2016-01-14T02:07:52+5:302016-01-14T02:07:52+5:30

एच-वन बी आणि एल-१ व्हिसावरील काही ठराविक वर्गातील शुल्क अमेरिकेने वाढविले आहे. ही अतिरिक्त वाढ ४ हजार अमेरिकी डॉलरपर्यंत करण्यात आली असून, त्याचा फटका

H-1B, L-One visa fee increased by the United States | एच-वन बी, एल-वन व्हिसा शुल्क अमेरिकेने वाढविले

एच-वन बी, एल-वन व्हिसा शुल्क अमेरिकेने वाढविले

वॉशिंग्टन : एच-वन बी आणि एल-१ व्हिसावरील काही ठराविक वर्गातील शुल्क अमेरिकेने वाढविले आहे. ही अतिरिक्त वाढ ४ हजार अमेरिकी डॉलरपर्यंत करण्यात आली असून, त्याचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसणार आहे.
व्हिसा शुल्क वाढीची घोषणा यूस सिटीझनशिप अ‍ॅण्ड इमिग्रेशन सर्व्हिसतर्फे (यूएससीआयएस) करण्यात आली. एच-वन बी व्हिसात काही विशिष्ट वर्गासाठी अर्ज करणाऱ्यांना ४ हजार अमेरिकी डॉलर इतके अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. १८ डिसेंबर २०१५ नंतर हे व्हिसा शुल्क लागू झाले आहे. याशिवाय ज्यांनी एल-१ ए आणि एल-१बी साठी अर्ज केला आहे त्यांना अतिरिक्त ४५०० अमेरिकी डॉलर इतके अतिरिक्त शुुल्क भरावे लागेल. ज्यांच्याकडे ५० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्यांना हे लागू राहील.

Web Title: H-1B, L-One visa fee increased by the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.