वॉशिंग्टन : एच-वन बी आणि एल-१ व्हिसावरील काही ठराविक वर्गातील शुल्क अमेरिकेने वाढविले आहे. ही अतिरिक्त वाढ ४ हजार अमेरिकी डॉलरपर्यंत करण्यात आली असून, त्याचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसणार आहे.व्हिसा शुल्क वाढीची घोषणा यूस सिटीझनशिप अॅण्ड इमिग्रेशन सर्व्हिसतर्फे (यूएससीआयएस) करण्यात आली. एच-वन बी व्हिसात काही विशिष्ट वर्गासाठी अर्ज करणाऱ्यांना ४ हजार अमेरिकी डॉलर इतके अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. १८ डिसेंबर २०१५ नंतर हे व्हिसा शुल्क लागू झाले आहे. याशिवाय ज्यांनी एल-१ ए आणि एल-१बी साठी अर्ज केला आहे त्यांना अतिरिक्त ४५०० अमेरिकी डॉलर इतके अतिरिक्त शुुल्क भरावे लागेल. ज्यांच्याकडे ५० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्यांना हे लागू राहील.
एच-वन बी, एल-वन व्हिसा शुल्क अमेरिकेने वाढविले
By admin | Published: January 14, 2016 2:07 AM