वॉशिंग्टन : २0१६ या वर्षात भारतातील सात मोठ्या कंपन्यांच्या एच-१बी व्हिसात ३७ टक्के घट झाली आहे. या वर्षात या कंपन्यांचे ९,३५६ नवे व्हिसा अर्ज मंजूर करण्यात आले. २0१५ च्या तुलनेत त्यांना ५,४३६ व्हिसा कमी मिळाले. वॉशिंगटन स्थित नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. सात भारतीय कंपन्यांना मंजूर झालेल्या व्हिसाचे प्रमाण अमेरिकेच्या एकूण कामकरी मनुष्यबळाच्या तुलनेत 0.00६ टक्के इतके अल्प आहे. फाउंडेशनने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) व्हिसाचे प्रमाण ५६ टक्क्यांनी घटले आहे. टीसीएसला २0१५ मध्ये ४,६७४ व्हिसा मिळाले होते, २0१६ मध्ये मात्र फक्त २,0४0 व्हिसा मिळाले. याचाच अर्थ कंपनीला २,६३४ व्हिसा कमी मिळाले. विप्रोला ५२ टक्के म्हणजे १,६0५ व्हिसा कमी मिळाले. २0१५ मध्ये विप्रोच्या व्हिसाची संख्या ३,0७९ असताना २0१६ मध्ये ती १,४७४ झाली. इन्फोसिसला १६ टक्के म्हणजेच ४५४ व्हिसा कमी मिळाले. इन्फोसिसच्या व्हिसाची संख्या २,८३0 वरून २,३७६ वर आली.>ट्रम्प यांच्या धोरणांचा परिणाम नाही२0१६ मध्ये मंजूर करण्यात आलेले एच-१बी व्हिसा अर्ज कंपन्यांनी एप्रिल २0१६ मध्ये सादर केलेले होते. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेत सत्तेवर नव्हते. याचाच अर्थ व्हिसा कमी संख्येने मिळण्यास ट्रम्प यांची धोरणे कारणीभूत नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. काही कंपन्यांना २0१६ मध्ये मिळालेला एच-१बी व्हिसा टीसीएस - २,0४0 कॉग्निझंट - ३,९४९इन्फोसिस - २,३७६अॅमेझॉन - १,४१६टेक महिंद्रा - १,२२८कॅपजेमिनी - १,१६४टीसीएस - २,0४0आयबीएम - १,६0८विप्रो - १,४७४मायक्रोसॉफ्ट - १,१४५इंटेल - १,0३0
एच-१बी व्हिसात झाली ३७ टक्के घट
By admin | Published: June 07, 2017 12:02 AM