वॉशिंग्टन : अमेरिकेत काम करणाऱ्या एच १ बी व्हिसाधारक विदेशी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करून ते ६० हजार डॉलरवरून किमान ८० हजार डॉलर करा, असे आवाहन अमेरिकेचे कामगार मंत्री एलेक्झेंडर एकोस्टा यांनी केले आहे. भारतीय आयटी कंपन्यांत हा व्हिसा अधिक लोकप्रिय आहे. एका संसदीय समितीला एकोस्टा यांनी सांगितले की, या निर्णयामुळे एच १ बी व्हिसाच्या आधारे अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या जागेवर येणाऱ्या बाहेरील कर्मचाऱ्यांची समस्या काही प्रमाणात कमी होईल. संसदेने अनेक वर्षांपासून ६० हजार डॉलरची वेतनाची मर्यादा वाढविली नाही. महागाईच्या आधारे हे वेतन वाढवायचे ठरल्यास ते किमान ८० हजार डॉलर एवढे होते. अनेक कंपन्यांना ते न परवडल्यास विदेशी कर्मचाऱ्यांच्या तेथील नोकऱ्या जातील व परत निघून गेल्यास अमेरिकन लोकांना त्या नोकऱ्या मिळू शकतील. सिनेटर रिचर्ड डर्बिन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कामगार मंत्री एकोस्टा यांनी ही माहिती दिली. डर्बिन यांनी एका फार्मा कंपनीचा उल्लेख केला होता. या कंपनीतील १५० आयटी कर्मचाऱ्यांना हटविण्याचा विचार सुरू आहे. हे कर्मचारी या कंपनीत अनेक वर्षांपासून काम करत आहेत.
एच१-बीधारकांचे वेतन ८० हजार डॉलर करा
By admin | Published: June 30, 2017 12:28 AM