Join us

HAL Recruitment 2020: हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी, दरमहा ४३,००० पगार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 10:37 PM

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. एचएएल डिप्लोमा टेक्निशियनच्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर आहे.

ठळक मुद्दे डिप्लोमा टेक्निशियन (मेकॅनिक) आणि डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) च्या पदांसाठी भरती होणार

बंगळुरू - हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने नॉन एक्झिक्युटिव्ह कॅडरमध्ये डिप्लोमा टेक्निशियनच्या पदांसाठी भरतीय प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेसाठीचे अर्ज एचएएलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार hal-india.co.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. एचएएल डिप्लोमा टेक्निशियनच्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर आहे.या भरतीप्रक्रियेसाठी एचएएलकडून प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीनुसार डिप्लोमा टेक्निशियन (मेकॅनिक) आणि डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) च्या १५ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. ही सर्व पदे एससी, एसटी आणि ओबीसीसाठी राखीव आहेत. तसेच या पदांवर उमेदवारांची भरती ही टेन्योन बेसिसवर चार वर्षांसाठी करण्यात येणार आहे.ज्या उमेदवारांनी १०वीनंतर मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकलची पूर्णवेळ पदविका उत्तीर्ण केला आहे असे उमेदवार या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी पात्र असतील. या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी उमेदवारांसाठीची वयोमर्यादा कमाल ३१ वर्षे तर एससी आणि एसटीच्या पदांसाठीची कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे आहे.या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा ४३ हजार रुपये एवढे वेतन दिले जाईल. यामध्ये १६ हजार ८२० बेसिक आणि पर्सनल पे आणि २६ हजार २८० रुपयांचे अन्य भत्ते आणि लाभ असतील.डिप्लोमा टेक्निशियन पदांसाठी उमेदवारांची निवड ही हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल. ही परीक्षा बंगळुरू येथे आयोजित केली जाणार आहे.

 

टॅग्स :नोकरीभारतव्यवसाय