Join us

Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 2:29 PM

Haldiram Snacks Food Pvt Ltd : देशातील सर्वात लोकप्रिय कंपन्यांपैकी एक असलेल्या हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मालकी हक्क खरेदी करण्यासाठी जगातील आघाडीच्या कंपन्यांची त्यावर नजर आहे.

देशातील सर्वात लोकप्रिय कंपन्यांपैकी एक असलेल्या हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (Haldiram Snacks Food Pvt Ltd) मालकी हक्क खरेदी करण्यासाठी जगातील आघाडीच्या कंपन्यांची त्यावर नजर आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, जगातील सर्वात मोठा खासगी इक्विटी फंड ब्लॅकस्टोन (Blackstone), अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी (ADIA) आणि जीआयसी ऑफ सिंगापूर (GIC of Singapore) यांनी मिळून हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडमधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात कंपनीला पाठवला होता. हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडचं मूल्यांकन ८ अब्ज ते ८.५ अब्ज डॉलर (६६,४०० कोटी ते ७०,५०० कोटी रुपये) असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. हल्दीरामच्या दिल्ली आणि नागपूरव्यवसायातील हिस्सा खरेदी करण्याची चर्चा आहे. 

ही कंपनीही शर्यतीत 

मिंटच्या रिपोर्टनुसार, ब्लॅकस्टोन आणि त्याच्या सहकाऱ्यांव्यतिरिक्त बेन कॅपिटलची नजर हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडवरही आहे. बेन कॅपिटलनं हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडशी अनेकदा चर्चा केली आहे. पण अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. 

किती हिस्सा विकण्यावर चर्चा? 

रिपोर्टनुसार, ब्लॅकस्टोन आणि त्यांचे सहकारी मिळून हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडमधील ७४ ते ७६ टक्के हिस्सा खरेदी करू इच्छित आहेत. परंतु ब्लॅकस्टोनशी संलग्न अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी आणि जीआयसीकडे फारसा हिस्सा राहणार नाही. जर हा करार यशस्वी झाला तर ब्लॅकस्टोनची भारतातील ही सर्वात मोठी हिस्स्यातील खरेदी असेल. 

८७ वर्षे जुन्या स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडमधील हिस्सा खरेदी करण्याच्या बाबतीत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडनेही या संपूर्ण प्रकरणात कोणतेही निवेदन जारी केलेलं नाही. हल्दीरामच्या नागपूर आणि दिल्ली व्यवसायाच्या यशस्वी मर्जरवर या संपूर्ण व्यवहाराचे यश अवलंबून असेल. एप्रिलमध्ये सीसीआयनं मर्जरला मंजुरी दिली होती. ब्लॅकस्टोन या कराराबाबत किती उत्सुक आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, फंड कंपनीनं कॅनडा आणि आशियातील आपल्या सहकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. 

मर्जरनंतर परिस्थिती कशी असेल? 

हल्दीराम कुटुंब सध्या ३ भागात विभागलं गेलं आहे. सध्या नागपूर बिझनेस (हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड) आणि दिल्ली बिझनेस (हल्दीराम स्नॅक्स प्रायव्हेट लिमिटेड) यांच्या मर्जरची चर्चा आहे. या दोन्ही कंपन्यांच्या मर्जरनंतर हल्दीराम स्नॅक्स फूड्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवी कंपनी अस्तित्वात येणार आहे. मर्जरनंतर दिल्लीतील मनोहर अग्रवाल आणि मधू सुदन अग्रवाल यांचा कंपनीत ५५ टक्के हिस्सा असेल. तर नागपूरच्या कमलकिशन अग्रवाल यांचा हिस्सा ४५ टक्के असेल. हल्दीरामच्या ईशान्य भागात व्यवसाय देणारी कंपनी या मर्जरपासून दूर आहे.

टॅग्स :व्यवसायनागपूर