नवी दिल्ली : ग्राहक वस्तूंसाठी (कंझ्युमर गुड्स) कर्ज घेणाऱ्यांत ४९ टक्के लोक ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, अशी माहिती ट्रान्सयुनियन सिबिल-गुगल अहवालातून समोर आली आहे. अहवालानुसार, कर्जदारांचे वैविध्य वाढत चालले आहे. २०२० मधील ७१ टक्के कर्जदार बिगर मेट्रो भागातील आहेत. तसेच त्यात २४ टक्के महिलांचा समावेश आहे. २५ हजारांपेक्षा कमी रकमेच्या ‘स्मॉल टिकेट’ कर्जांचे प्रमाण २०१७ मध्ये अवघे १० टक्के होते, ते २०२० मध्ये वाढून तब्बल ६० टक्के झाले आहे. ‘फोनवर कर्ज’, ‘हप्त्यावर लॅपटॉप’ आणि ‘महिलांना ३० हजारांचे कर्ज’ यांसारख्या योजनांमुळे या कर्जांचे प्रमाण वाढले आहे. ही कर्जे घेताना जास्त कटकटी नाहीत, तसेच अदायगीही झटपट होते. त्यामुळे त्यांची मागणी वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे एकूण वैयक्तिक कर्जांपैकी ९७ टक्के कर्जे २५ हजार रुपयांच्या आतील आहेत.
कर्ज घेणाऱ्यांत अर्धे लोक तिशीच्या आतील, एका सर्वेक्षणातील माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 6:30 AM