- हरिश गुप्ता
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाला केंद्राकडून मिळणारे अर्थसाह्य तीन वर्षांत घटून जवळपास अर्ध्यावर आले. राज्यातील ८४ प्रकल्पांना २0१४-१५ मध्ये अर्थसाह्य मिळाले होते. त्यापुढील वर्षी मदत मिळणाºया प्रकल्पांची संख्य ७0, तर २0१६-१७ मध्ये ४७ झाली.
शेतमाल नाशिवंत असल्याने प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे सरकारी धोरण आहे. त्यानुसार या उद्योगांना केंद्राचे अर्थसाह्य मिळते. याबाबत हरिश्चंद्र चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर अन्न व प्रक्रिया मंत्री म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत महाराष्टÑाच्या ३२ जिल्ह्यांतील २0१ अन्न प्रक्रिया उद्योगांना (कारखाने) केंद्रीय अर्थसाह्याचा लाभ मिळाला.
३१ हजार ४८६ कोटींचे नुकसान
मंत्र्यांनी सांगितले की, वार्षिक उद्योग सर्वेक्षण २0१४-१५ नुसार, महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया प्रकल्पांची संख्या ३,0१४ इतकी आहे. नोंदणीकृत कारखान्यांतून २.३९ लाख जणांना रोजगार मिळाला आहे. हंगाम आणि हंगामोत्तर काळात फळे आणि भाजीपाला खराब होऊन होणा-या नुकसान सुमारे ३१,४८६ कोटी रुपये इतके मोठे आहे. २0१२-१३ या वित्त वर्षातील उत्पादनाची आकडेवारी तसेच २0१४ मधील किमती या सर्वेक्षणासाठी गृहीत धरण्यात आल्या आहेत.
अन्न प्रक्रिया उद्योगाचे अर्थसाह्य निम्म्यावर, महाराष्ट्राला फटका
महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाला केंद्राकडून मिळणारे अर्थसाह्य तीन वर्षांत घटून जवळपास अर्ध्यावर आले. राज्यातील ८४ प्रकल्पांना २0१४-१५ मध्ये अर्थसाह्य मिळाले होते.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:49 AM2018-03-11T01:49:27+5:302018-03-11T01:49:27+5:30