Join us

अन्न प्रक्रिया उद्योगाचे अर्थसाह्य निम्म्यावर, महाराष्ट्राला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 1:49 AM

महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाला केंद्राकडून मिळणारे अर्थसाह्य तीन वर्षांत घटून जवळपास अर्ध्यावर आले. राज्यातील ८४ प्रकल्पांना २0१४-१५ मध्ये अर्थसाह्य मिळाले होते.

- हरिश गुप्तानवी दिल्ली - महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाला केंद्राकडून मिळणारे अर्थसाह्य तीन वर्षांत घटून जवळपास अर्ध्यावर आले. राज्यातील ८४ प्रकल्पांना २0१४-१५ मध्ये अर्थसाह्य मिळाले होते. त्यापुढील वर्षी मदत मिळणाºया प्रकल्पांची संख्य ७0, तर २0१६-१७ मध्ये ४७ झाली.शेतमाल नाशिवंत असल्याने प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे सरकारी धोरण आहे. त्यानुसार या उद्योगांना केंद्राचे अर्थसाह्य मिळते. याबाबत हरिश्चंद्र चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर अन्न व प्रक्रिया मंत्री म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत महाराष्टÑाच्या ३२ जिल्ह्यांतील २0१ अन्न प्रक्रिया उद्योगांना (कारखाने) केंद्रीय अर्थसाह्याचा लाभ मिळाला.३१ हजार ४८६ कोटींचे नुकसानमंत्र्यांनी सांगितले की, वार्षिक उद्योग सर्वेक्षण २0१४-१५ नुसार, महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया प्रकल्पांची संख्या ३,0१४ इतकी आहे. नोंदणीकृत कारखान्यांतून २.३९ लाख जणांना रोजगार मिळाला आहे. हंगाम आणि हंगामोत्तर काळात फळे आणि भाजीपाला खराब होऊन होणा-या नुकसान सुमारे ३१,४८६ कोटी रुपये इतके मोठे आहे. २0१२-१३ या वित्त वर्षातील उत्पादनाची आकडेवारी तसेच २0१४ मधील किमती या सर्वेक्षणासाठी गृहीत धरण्यात आल्या आहेत.

टॅग्स :अन्नभारत