Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील निम्मे सोने गहाण!

देशातील निम्मे सोने गहाण!

भारतातील एकूण सोन्यापैकी निम्मे सोने लोकांनी अडीअडचणींच्या वेळी कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवले असून यापैकी बहुतांश सोने केरळमधील तीन प्रमुख कंपन्यांकडे ठेवलेले

By admin | Published: December 28, 2016 01:53 AM2016-12-28T01:53:41+5:302016-12-28T01:53:41+5:30

भारतातील एकूण सोन्यापैकी निम्मे सोने लोकांनी अडीअडचणींच्या वेळी कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवले असून यापैकी बहुतांश सोने केरळमधील तीन प्रमुख कंपन्यांकडे ठेवलेले

Half a gold mortgage in the country! | देशातील निम्मे सोने गहाण!

देशातील निम्मे सोने गहाण!

नवी दिल्ली : भारतातील एकूण सोन्यापैकी निम्मे सोने लोकांनी अडीअडचणींच्या वेळी कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवले असून यापैकी बहुतांश सोने केरळमधील तीन प्रमुख कंपन्यांकडे ठेवलेले आहे, अशी आकडेवारी समोर आली आहे.
देशात सोन्याच्या तारणावर कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये मुथुट फायनान्स,मणप्पुरम फायनान्स आणि मुथुट फिनकॉर्प या तीन अग्रगण्य कंपन्या असून भारतातील एकूण ५५८ टन सोन्यापैकी सुमारे ४७ टक्के म्हणजे २६३ टन सोने लोकांनी कर्जासाठी या कंपन्यांकडे गहाण ठेवलेले आहे. यापैकी सवाधिक १५० टन सोने मुथुच फायनान्सकडे आहे तर मणप्पुरम फायनान्सकडे ६५.९ टन व मुथुट फिनकॉर्पकडे ४६.८८ टन सोने आहे.
देशातील सुवर्णसाठ्यांच्या दृष्टीने विचार केल्यास भारताचा जगात ११ वा क्रमांक लागत असला तरी फक्त या तीन कंपन्यांमध्ये लोकांनी तारण म्हणून ठेवलेले सोने सिंगापूर, स्वीडन, आॅस्ट्रेलिया, कुवेत आणि फिनलँड या देशांकडील एकूण सोन्याहून जास्त आहे.
जगभरातील सोन्याच्या मागणीपैकी ३० टक्के सोने भारतात विकले जाते. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Half a gold mortgage in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.