मुंबई : शिक्षण संपताच प्रत्येक जण नोकरी शोधत असतो; पण शिकतानाच पैसे कमावण्याची संधी विमा क्षेत्रात आहे. दीड लाख कोटी रुपयांच्या बाजारपेठेत विमा कंपनीचे एजंट बनून स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य आहे.सर्वांचे आयुष्य धकाधकीचे असल्याने प्रत्येक जण जीवन विमा काढतो; पण आयुष्यातील जोखीम पाहता केवळ जीवन विमाच नव्हे, तर आरोग्य, घर, मोटर, मौल्यवान वस्तू व अन्य संपत्तीचा विमा काढणे महत्त्वाचे असते. त्यामुळे देशात सामान्य विम्याची मागणी वाढत आहे. देशातील २८ कोटी नागरिकांकडे असा विमा असून, वार्षिक १६ टक्क्यांनी हे क्षेत्र वाढत आहे. या क्षेत्रात त्यामुळेच तरुणांना स्वबळावर काही करून दाखविण्याची संधी आहे.एजंट हा विमा कंपनी व विमाधारक (ग्राहक) यांच्यातील दुवा असतो. ग्राहकांना सर्वोत्तम सुरक्षा उत्पादन देतानाच त्यातून लाभ मिळवून देण्याचे काम एजंट करतो. एकदा विश्वासार्हता मिळताच एजंटसाठी उन्नतीची नवी दारे उघडतात. न्यू इंडिया अॅश्युरन्स ही सार्वजनिक क्षेत्रातील अव्वल कंपनी यासाठी पुढे आली आहे.न्यू इंडिया अॅश्युरन्स ४० वर्षांहून अधिक काळापासून भारतीय व्यावसायिक बाजारपेठेत सामान्य विमा श्रेणीत अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या कंपनीचे काम २८ देशांत आहे. कंपनीने भांडवली बाजारातही प्रवेश केला आहे. ९६०० कोटी रुपयांच्या भाग भांडवलासाठी कंपनीने काढलेल्या आयपीओला प्रचंड मागणी आली.एजंटस् म्हणून करिअरसाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स सर्वोत्तम आहे. कंपनी एजंटस्ना जागतिक स्तराचे प्रशिक्षण देते. शाखा कार्यालय ते प्रधान कार्यालयापर्यंत कंपनीचे व्यवस्थापक एजंटस्ना नियमित प्रशिक्षित करतात. दर १५ दिवसांनी एजंटस्ची बैठक, त्यात समस्यांचे निराकरण केले जाते. कंपनीचा विपणन व विक्री चमूही एजंटस्ना उत्तम सहकार्य करतो, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.विविध कंपन्या एजंटस्ना आकर्षक कमिशन देतात. न्यू इंडिया अॅन्श्युरन्सही त्यात मागे नाही. एजंटस्साठी आकर्षक कमिशन व विविध पुरस्कार योजना कंपनी राबवते. नव्या विशेष एजंट क्लब लाभ योजनेंतर्गत जेवढे चांगले काम, तितकी अधिक कमाई करता येते. सामान्य एजंटस्ना मासिक भत्ता व नवीन व्यवसाय वा पॉलिसी नूतनीकरणासाठी कमिशन दिले जाते. शिवाय विविध क्लबचे सदस्यत्व मिळते. वर्षातून एकदा क्लब सदस्याला एजंट संमेलनासाठी येण्या-जाण्याच्या खर्चासह प्रवासभाडे मिळते. पुरस्कार योजनेंतर्गत प्रत्येक पॉॅलिसीवर स्वतंत्रपणे ठराविक कमिशन मिळते. एजंटस्साठी २४ ताशी पोर्टल आहे, असेही कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.एजंट होण्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास व वयाची १८ वर्षे पूर्ण ही आहे. विमा नियंत्रण व विकास प्राधिकरणाकडून (इर्डा) ५० गुणांची परीक्षा घेतली जाते. कंपनीच्या संकेतस्थळावरून वा जवळच्या कार्यालयात अर्ज मिळू शकतील. परीक्षा पास झाल्यानंतर २५ तासांचे प्रशिक्षण कंपनीच देते. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रसुद्धा एजंटना मिळते.एजंट होण्यासाठीशिक्षण : मान्यताप्राप्त बोर्डाकडून किमान दहावी उत्तीर्णवय : किमान १८ वर्षे पूर्णप्रक्रिया : विमा नियंत्रण व विकास प्राधिकरणाची (इर्डा) परीक्षागुण : ५०प्रशिक्षण : किमान २५ तासकंपनीची २३२० कार्यालये- न्यू इंडिया अॅश्युरन्सची देशात २३२० कार्यालये आहेत. त्यामध्ये१२३९ सूक्ष्म कार्यालयांचा समावेश आहे. कंपनीचे १९ हजार कर्मचारी व५० हजार एजंटस् आहेत. सरकारच्या गटविमा योजनेसह कंपनीच्या२२० पॉलिसिज विमा व्यवसायाच्या सर्वच क्षेत्रांत आहेत. ग्रामीण विम्यासह मोटार वाहन, आरोग्य, प्रवास, किरकोळ विमा व अन्य मौल्यवान वस्तूंचा विमा ही कंपनी पुरवते.- ग्राहकांना विमा नूतनीकरण करताना पर्याय दिले जातात. सर्व कार्यालयांत ग्राहक सेवा विभाग आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२२७०८४०७/६२४या क्रमांकावर संपर्क साधता येईल.- कंपनीच्या www.newindia.co.in (डब्लूडब्लूडब्लू.न्यूइंडिया.सीओ.इन) या संकेतस्थळाला भेट देता येईल.
दीड लाख कोटींच्या विमा बाजारपेठेतील संधी; शिकत असताना पैसेही कमवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 5:44 AM