Lokmat Money > बिझनेस न्यूज > निम्म्या भारतीय कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी, बँकांत ठेवली जाते सर्वाधिक बचत

निम्म्या भारतीय कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी, बँकांत ठेवली जाते सर्वाधिक बचत

आर्थिक सुरक्षेबाबत देशात अजूनही हवी तेवढी जनजागृती नाही. तब्बल ६९% भारतीय कुटुंबे वित्तीय सुरक्षेपासून दूर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 08:35 AM2022-11-11T08:35:31+5:302022-11-11T08:35:46+5:30

आर्थिक सुरक्षेबाबत देशात अजूनही हवी तेवढी जनजागृती नाही. तब्बल ६९% भारतीय कुटुंबे वित्तीय सुरक्षेपासून दूर आहेत.

Half of Indian households with an average monthly income of less than 15 thousand have the highest savings in banks | निम्म्या भारतीय कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी, बँकांत ठेवली जाते सर्वाधिक बचत

निम्म्या भारतीय कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी, बँकांत ठेवली जाते सर्वाधिक बचत

नवी दिल्ली :

आर्थिक सुरक्षेबाबत देशात अजूनही हवी तेवढी जनजागृती नाही. तब्बल ६९% भारतीय कुटुंबे वित्तीय सुरक्षेपासून दूर आहेत. तसेच कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न २३ हजार रुपये असल्याचे आढळून आले आहे़. बचतीसाठी बँकांतील ठेवींना प्राधान्य ७० टक्के भारतीय कुटुंबे काही ना काही प्रमाणात बँक ठेवी, विमा, पोस्टातील बचत आणि सोने यात गुंतवणूक करतात. सर्वाधिक बचत बँका आणि पोस्टात होते. त्यानंतर, विमा आणि सोन्याचा क्रमांक लागतो. 

‘मनी ९’चे सर्वेक्षण भारतीय कसे कमावतात, कसे खर्च करतात आणि कशी बचत करतात. याची माहिती सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. 

मनी ९ वित्तीय सुरक्षा निर्देशांक सर्वेक्षण अहवाल
सरासरी ४.२ व्यक्ती असलेल्या भारतीय कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न २३ हजार रुपये आहे. 

६९% बचत बँकांत, १९% कुटुंबांकडे विमा, ०३% भारतीय कुटुंबे चैनीचे आयुष्य जगू शकतात, ५१% इतर, ४६%
भारतीय कुटुंबांचे उत्पन्न  १५ हजार रुपयांपेक्षा कमी 

ॲस्पायरिंग क्लास : बचत कमी

  • महत्त्वाकांक्षी समुदायांत (ॲस्पायरिंग क्लास) बचतीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. 
  • त्याचप्रमाणे, याच श्रेणीतील दोन पंचमांश भारतीय कुटुंबांत कोणत्याही प्रकारे वित्तीय बचत होत नाही. 
  • धोरणकार आणि बाजारातील प्रभावशाली संस्थांनी यावर काहीतरी तोडगा काढण्याची गरज आहे.

Web Title: Half of Indian households with an average monthly income of less than 15 thousand have the highest savings in banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.